Goa: यशवंत कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घ्या: जीत आरोलकर

पेडणे (Pernem, Goa) तालुक्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता त्यावेळी जीत आरोलकर (Jeet Akolkar) बोलत होते.
Meritorious students were felicitated in Pernemt, Goa
Meritorious students were felicitated in Pernemt, Goa
Published on
Updated on

मोरजी: इन्टरनेट (Internet) नसतानाही कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवले, या यशवंत व आणि कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा (Topper Students) आदर्श घेवून विधार्थ्यांनी शैक्षणिक विकास साधावा , अश्या विधार्थ्याना पुढील शिक्षणासाठी कोणत्याही अडचणी येवू देणार नाही अशी ग्वाही ,मगोचे नेते जीत आरोलकर यांनी मांद्रे पंचायत सभागृहात पेडणे तालुक्यातील शालांत परीक्षेत सर्वाधिक पेडणे तालुक्यातून गुण मिळवलेल्या नम्रता अशोक साळगावकर व अंशीका दशरथ बर्डे या विधार्थ्यान्चा गौरव सोहळा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. (Meritorious students were felicitated in Pernem, Goa)

यावेळी मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर , माजी सरपंच राघोबा गावडे ,सेरोफिन फर्नांडीस ,आम्रोज फर्नांडीस , पार्से माजी सरपंच देवेंद्र प्रभू देसाई आदी उपस्थित होते. नम्रता अशोक साळगावकर व अंशीका दशरथ बर्डे या दोन्ही यशवंत विधार्थ्यान्चा मगो चे नेते जीत आरोलकर यांच्या हस्ते रोख रक्कम पुष्पगुच्छ देवून गौरव केला.

Meritorious students were felicitated in Pernemt, Goa
Goa Politics : विद्यार्थ्यांना मोफत व्हायफाय इंटरनेट सुविधा

यावेळी जीत आरोलकर यांनी यशवंत विधार्थ्यानी गरीबीवर मात करत कोणत्याच सोयी सुविधा नसताना , इन्टरनेट सेवा नसतानाही या विधार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून पेडणे तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला , त्याबद्द दोघांचे अभिनंदन करताना ज्या पालकांनी या विधार्थ्याना घडवले त्यांच्याविषयी जीत आरोलकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली .विधार्थ्यानी शिक्षणातून प्रगती करत असताना या पुढे कोणचेही शिक्षण आर्थिक पाठ्बळाशिवाय राहणार नाही याची ग्वाही जीत आरोलकर यांनी दिली .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com