Panjim News: दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पणजी जायंट्‌सतर्फे सत्‍कार

Student Felicitation: पणजीतील फोमेंतो सभागृहात पार पडला कार्यक्रम
Student Felicitation: पणजीतील फोमेंतो सभागृहात पार पडला कार्यक्रम
Panjim Giants Students FelicitationDainik Gomantak

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पणजी जायंट्‌स ग्रुपने सत्‍कार घडवून आणला. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून निवृत्त प्राचार्य सुभाष कवठणकर यांची उपस्‍थिती होती. त्‍यांनी मुलांना मौलिक मार्गदर्शन केले.

प्रारंभी ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कामत यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच ग्रुपच्‍या कार्याची माहिती दिली. मान्‍यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्‍यांना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम पणजीतील फोमेंतो सभागृहात पार पडला. पणजी जायंट्‌स ग्रुपतर्फे राबविण्यात येणाऱ्या अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि ते अधिक जोमाने अभ्यास करतात, असे मत मान्यवरांनी मांडले.

यावेळी व्यासपीठावर जायंट्‌स वेलफेअर फाऊंडेशन समितीचे सदस्य संदीप नाडकर्णी, दीपक डिसोझा यांचीही उपस्‍थिती होती. ग्रुपचे सदस्य राजेश तारकर, विवेक जोशी, बिपीन कारापूरकर, लक्ष्मीकांत आमोणकर, रोहिदास वायगंणकर, राजू चोडणकर, प्रदीप नाईक आणि पालक कार्यक्रमाला हजर होते.

शुक्र उसगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भालचंद्र आमोणकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश म्हांबरे यांनी आभार मानले.

Student Felicitation: पणजीतील फोमेंतो सभागृहात पार पडला कार्यक्रम
Smart City Panjim: 'स्मार्ट सिटी' कामात घोळ सुरूच! रस्‍ते अचानक बंद; सांतिनेज, काकुलो जंक्शनवर वाहनचालकांची तारांबळ

यांचा झाला गौरव

अवनी नाईक (मेरी इमॅक्‍युलेट हायस्कूल), संदीप लमाणी (कस्तुरबा मातोश्री), रिया प्रभुगावकर, आरुष नाईक (पीपल्स), सानिका पोके (अवर लेडी), फिझा अन्सारी (ऑक्सिलम), अल्कामा मीर (अंजुमन नारुल), नितीन भंडारी (सांताक्रुझ), लक्ष्मी शर्मा (सेंट मायकल), नेहा आमोणकर, नीती आमोणकर (हेडगेवार), सोनू चौहान (सरकारी हायस्कूल मेरशी), श्‍‍वेता प्रजापती (सरकारी हायस्कूल चिंबल), दीपा डांगी (सरकारी हायस्कूल दोनापावला), श्याम कुमार (प्रोग्रेस हायस्कूल पणजी), समीना पाटील (युनियन हायस्कूल चिंबल), आयुषी नाईक (रोझरी हायस्कूल कुजिरा), एस. फर्नांडिस (डॉन बॉस्को), अफ्रिन शेख (अवर लेडी दोनापावला), रुही चोडणकर (डॉन बॉस्को).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com