Gas Leakage At Merces: क्लोरीन गॅसमुळे रहिवाशांना अजूनही भीती!

Merces Panchayat: मेरशी पंचायतीने भंगारअड्डे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे
Merces Panchayat: मेरशी पंचायतीने भंगारअड्डे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे
Gas Leakagecanava

बामणभाट येथील रहिवाशांनी क्लोरीन गॅसचा वास येत असल्याची तक्रार गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर मंडळाचे अधिकारी आज येथे पाण्याचे नमुने आणि वायू प्रदूषण तपास करण्यासाठी आले होते. अजूनही परिसरात भीतीचे वातावरण असून प्रदूषणाबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

वायू प्रदूषणामुळे अस्वस्थ झाल्याने भंगारअड्ड्याचा मालक नामदेव पचांगे अजूनही गोमेकॉत असून इतर चौघांना घरी पाठविण्यात आले आहे. पचांगेला दम्याचा त्रास असल्याने डॉक्टरांनी त्याला देखरेखीखाली ठेवले असल्याची माहिती गोमेकॉतून देण्यात आली आहे.

मेरशी पंचायतीने उपजिल्हाधिकारी आणि जुने गोवे पोलिस निरीक्षक यांना पत्र लिहून भंगारअड्डे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे. काल पहाटे झालेल्या घटनेनंतर लोकांच्या मनात भय निर्माण झाल्याचा पत्रात उल्लेख केला आहे. त्यासाठी हा अड्डा बंद करण्याची सूचना सरपंच प्रमोद कामत यांनी केली आहे.

Merces Panchayat: मेरशी पंचायतीने भंगारअड्डे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे
Gas Leakage At Merces: ‘क्लोरिन गळती’मुळे मेरशीत सहाजण अत्यवस्थ

तत्पूर्वी मेरशी गाव विकास समितीने काल मेरशी पंचायतीला पत्र लिहून मेरशी परिसरातील सर्व भंगारअड्डे बंद करण्याची मागणी केली होती. काल झालेल्या घटनेतून भंगारअड्डे धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आम्ही वारंवार ग्रामसभा आणि पत्र व्यवहारातून भंगारअड्डे धोकादायक असल्याचा विषय मांडून याचे गांभीर्य पंचायतीच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केल्याचे पत्रात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com