Mega Projects: मेगा प्रकल्‍पांच्या परवानगीसाठी 'सुकाणू समिती' स्थापन! मुख्यमंत्री अध्यक्षस्थानी; सुविधांबाबत होणार विचार

Mega Projects Approval Goa: नगर व ग्राम विकार प्राधिकरणे, नगर नियोजन मंडळ यांचे अधिकार सुकाणू समितीला सरकारने देण्याचा धोरणात्मक निर्णय अर्थसंकल्पीय भाषणातून घेतला आहे.
Construction
Mega ProjectsCanva
Published on
Updated on

पणजी: गावांत मोठ्या प्रकल्पांना (मेगा प्रोजेक्ट) परवानगी देण्याचा निर्णय यापुढे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समिती घेणार आहे. आजवर याचा निर्णय नगरनियोजन मंडळ घेत होते.

मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात याची घोषणा केली असून लवकरच किती आकाराच्या वरील भूखंडावरील प्रकल्पांबाबत सुकाणू समिती निर्णय घेईल याची अधिसूचना जारी केली जाणार आहे. नगर व ग्राम विकार प्राधिकरणे, नगर नियोजन मंडळ यांचे अधिकार सुकाणू समितीला सरकारने देण्याचा धोरणात्मक निर्णय अर्थसंकल्पीय भाषणातून घेतला आहे.

Construction
Illegal Construction: रस्त्यालगतची बेकायदा बांधकामे 15 दिवसांत हटवणार! खंडपीठाचा आदेश; कायदा दुरुस्तीसाठी होणार चाचपणी

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या गावात मोठा प्रकल्प आला की त्याला स्थानिक पातळीवर विरोध होतो. त्यावेळी पाणी, वीज टंचाई अशी कारणे पुढे केली जातात. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांचा विचार करणाऱ्या सुकाणू समितीवर पाणी पुरवठा खाते, वीज खाते, जलसंपदा खाते, सार्वजनिक बांधकाम खाते अशा खात्यांच्या प्रतिनिधींना स्थान दिले जाणार आहे. प्रकल्‍प येणाऱ्या ठिकाणी पुरेशा सुविधा आहेत की नाहीत याचा विचार करूनच निर्णय घेतला जाणार आहे.

Construction
Goa Investment: गोव्यात 'Central Park'चा Mega Project! 10,000 कोटींची होणार गुंतवणूक

सुकाणू समितीबाबत मुख्यमंत्री आग्रही असले तरी प्रादेशिक आराखड्याबाबत त्यांनी थोडीशी सौम्‍य भूमिका घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यक्तिशः प्रादेशिक आराखडा हवा असे वाटत असले तरी तो निर्णय सामूहिक म्हणजे मंत्रिमंडळाचा असेल. मंत्रिमंडळ बैठकीत सहकाऱ्यांशी चर्चा करूनच त्याबाबतचा उचित असा निर्णय घेतला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com