दाबोळी: वास्कोचे (Vasco) आमदार कार्लुस आल्मेदा (MLA Carlos Almeida) याने गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) पूर्वीची तयारीनिमित्त नगरसेवक, सरकारी अधिकाऱ्यांसमवेत विविध विषयावर बैठक घेतली. यावेळी वीज, पाणी, कचरा यावर सविस्तर बैठक पार पडली.
वास्को रवींद्र भवन मध्ये शुक्रवारपासून साजरा होणारा गणेश चतुर्थी निमित्त नगरसेवक, सरकारी पातळीवर आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यासमवेत मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी, उपनगराध्यक्षा श्रद्धा महाले, नगरसेवक दीपक नाईक, यतीन कामुर्लेकर, फ्रेडरिक हेन्रीक्स, नारायण बोरकर, वास्को वीज विभागाचे कार्यकारी अभियंता आर के कुलकर्णी, सहाय्यक अभियंता संजय म्हाळसेकर, बांधकाम पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश पैंगीणकर, कनिष्ठ अभियंता यशवंत नाईक, वास्को आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर रश्मी खांडेपारकर, पालिकेचे अभियंता मनोज आर्सेकर, सहाय्यक अभियंता आगुस्त मिस्किता, कनिष्ठ अभियंता एस कुडणेकर, अनिरुद्ध पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण गोव्या बरोबर वास्कोत येत्या 10 सप्टेंबर पासून साजरा होणारा गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त आमदार आल्मेदा याने उत्सवापूर्वीची बैठक विविध विषयी नगरसेवक, सरकारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. चतुर्थीपूर्वी सर्व प्रभागातील रस्त्यावर पथदीप बसवावे, तसेच विजेचा लपंडाव चतुर्थीला होऊ नये यासाठी वीज विभागाने सतर्कता पाळावी. पाणी विभागाने गोमंतक मधील टाकीचा उपयोग करावा, तसेच नवे वाडे येथील जायका प्रकल्पाच्या टाकीचा पाण्याचा साठा ठेवण्यासाठी उपयोग करावा. यावेळी पाणी विभागाचे अधिकारीऱ्यांनी माहिती दिली की, वास्को बरोबर मुरगाव, नवेवाडे, बायणा, मांगोरहिल परिसरात पाण्याची कोणतीही समस्या नसून जर एखाद्या कोणाच्या पिण्याच्या बहिणीला तांत्रिक अडचण असेल तेव्हाच पाण्याची समस्या त्या भागात पूर्ती निर्माण होते.
चतुर्थीत वास्कोत पाण्याची समस्या अजिबात निर्माण होणार नाही. पालिकेतर्फे घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी तीन व्यक्तींना कंत्राट दिले आहे. यातील एका कंत्राटदाराने घरोघरी कचरा गोळा केला नसल्याने नवे वाडे भागातील कचरा विविध ठिकाणी पडलेला आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल अशी माहिती सॅनेटरी निरीक्षक महेश कुडाळकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.