मॉन्सूनपूर्व कामांसाठी प्रवीण आर्लेकर यांची बैठक

उपाययोजनेसंदर्भात चर्चा करून त्यांनी सूचना केल्या.
Meeting of Praveen Arlekar for pre-monsoon works
Meeting of Praveen Arlekar for pre-monsoon worksDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: पेडणे मतदारसंघातील मॉन्सूनपूर्व कामे हातात घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी 9 रोजी येथील सरकारी विश्रामधामात विविध सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उपाययोजनेसंदर्भात चर्चा करून त्यांनी सूचना केल्या.

तिळारी धरणाचे पाणी अचानक सोडल्याने इब्रामपूर, हसापूर, खुटवळ, तळर्ण, हळर्ण आदी गावात येणारा पूर, शिरगळ येथे येणाऱ्या पुरामुळे उद्‌भवणारी परिस्थिती यंदा उद्‌भवू नये यासाठी आपण तिळारीच्या अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करून त्यावर कसा तोडगा काढता येईल, यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे आर्लेकर यांनी सांगितले.

Meeting of Praveen Arlekar for pre-monsoon works
पाणी घ्या, इंधन द्या: रवी नाईक

यावेळी मामलेदार अनंत मळीक, पेडणे गटविकास अधिकारी मनिष केदार, अभियंता कृष्णा गडेकर, पेडणे अग्निशामक दलाचे प्रमुख नामदेव परवार, पेडणे सरकारी इस्पितळाच्या आरोग्य अधिकारी डॉ. विद्या परब, संतोष शेटकर, जल प्रकल्प विभागातर्फे कनिष्ठ अभियंता अर्चना नागवेकर, अशोक हरमलकर, सुमंत नाडकर्णी, पेडणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंते लक्ष्मण नाईक, पेडणे वीज कार्यालयाचे साहाय्यक अभियंते विल्यम रॉड्रिग्स, पेडणे पाणी पुरवठा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंते मोरजकर, सोमा नाईक, गौरीश ठाकूर, चांदेल जल प्रकल्पाचे साहाय्यक अभियंते बाळाजी फडते, पेडणे कृषी कार्यालय अधिकारी प्रसाद परब, पेडणे पोलिस स्थानकाच्या वतीने उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, पेडणे वाहतूक विभागाचे निरीक्षक वीरेंद्र वेळुसकर आदी विविध खात्यांच्या कार्यालयांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com