Goa STEMI Project: हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वरदान! गोव्यातील 'स्टेमी प्रोजेक्ट' नक्की आहे काय? जाणून घ्या सविस्तर

गोव्यात 17 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत G20 च्या बैठका होणार आहेत.
Goa STEMI Project
Goa STEMI ProjectPIB Goa
Published on
Updated on

Goa STEMI Project: गोव्यात 17 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत G20 च्या बैठका होणार आहेत. G20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीपूर्वी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व गोवा सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या वतीने एक विशेष दौरा आयोजित केला होता.

यावेळी राष्ट्रीय आणि स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी हळदोणा येथील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राला भेट दिली. माध्यम शिष्टमंडळाने गोव्याच्या लसीकरण आणि स्टेमी (STEMI) प्रकल्पाची पाहणी केली.

गोवा सरकारने ट्रायकोग हेल्थ सर्व्हिसेस, प्रा. लि. बेंगळुरू यांच्या संयुक्त विद्यामाने स्टेमी प्रकल्प लॉन्च केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रगत आरोग्य पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे अकाली मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांश कमी करण्याचा उद्देश आहे.

एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन (STEMI) हा हृदयविकाराचा एक प्रकार आहे. या आजारात हृदयाच्या एखाद्या भागात रक्त प्रवाहाला अवरोध निर्माण होतो.

स्टेमी मॉडेलमुळे हृदयविकाराच्या रुग्णावर उपचारासाठी लागणारा सरासरी वेळ कमी करून 90 मिनिटांच्या ‘गोल्डन अवर’ जवळ आणला जात आहे. यामुळे असंख्य रुग्णांचे जीव वाचवणे शक्य होणार आहे.

Goa STEMI Project
Video: 'ए प्रविण, डेप्युटी कलेक्टर कोण तो खबर ना? मंत्री काब्राल आमदारावर भडकले, उपजिल्हाधिकाऱ्यालाही सुनावले

असा काम करतो स्टेमी प्रकल्प

स्टेमी प्रकल्पांतर्गत, एक हब आणि स्पोक मॉडेल तयार करण्यात आले आहे. कॅथ लॅब सुविधा असलेले हे मॉडेल त्रयस्थ उपचार रुग्णालय केंद्र म्हणून काम करते. तसेच, STEMI प्रकल्प अंतर्गत दिल्या जाणार्‍या सार्वजनिक आरोग्य सुविधा रूग्ण रेफरल होण्यापूर्वी रुग्णाला स्थिर करण्यासाठी ओळखल्या जातात.

प्रत्येक स्पोकमध्ये ट्रायकॉग ईसीजी मशीन असून, ती टेली-ईसीजी सुविधा आणि कार्डिओनेट अॅपसह सुसज्ज आहे. हा सर्व जो डेटा बेंगळुरूमधील हृदयरोगतज्ज्ञांच्या टीमसोबत जोडण्यात आलेला आहे. यामध्ये ECG अहवाल 5 मिनिटांत तयार होतात. या प्रकल्पात कार्डियाक अॅम्ब्युलन्सची देखील सुविधा आहे. तसेच, गरज भासल्यास रूग्णाला स्पोक मधून HUB ला रेफर करण्याची आणि रूग्णाच्या ट्रान्सफरच्या लाईव्ह ट्रॅकिंग सुविधा देखील आहे.

हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मयडे उपकेंद्रात राज्य सरकारद्वारे राबविण्यात आलेला लसीकरण कार्यक्रमाचे देखील यावेळी प्रदर्शन दाखविण्यात आले. प्रत्येक बालकाचे वेळेवर लसीकरण केले जाईल याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सुव्यवस्थित आणि प्रभावी वापराचे ही प्रणाली एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

या मॉडेल अंतर्गत, बाळाच्या जन्मानंतर, त्यांच्या लसीकरणाच्या वेळापत्रकाचा मागोवा ठेवण्यासाठी डिजिटल आणि प्रिंट रेकॉर्ड ठेवले जातात. मुलाच्या पालकांना फोन कॉलद्वारे आगामी लसीची आठवण करून दिली जाते. पालक शहराबाहेर असल्यास, त्यांना लस घेण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला जातो किंवा आरोग्य केंद्रात आल्यावर त्यांना डोस दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com