Ponda Parking: फोंड्यातील पार्किंगला शिस्त आणण्यात नगराध्यक्ष रितेश नाईक यशस्वी...

आहे त्या जागेत पार्किंगची योग्य सुविधा उपलब्ध करणे हे पालिकेसाठी मोठे शिवधनुष्यच
Ponda Parking
Ponda ParkingDainik Gomantak
Published on
Updated on

वाढती रहदारी, पण रस्ते मात्र आहे तेच. शहर परिसर असल्याने रस्त्यांची रुंदी वाढवणे शक्य नाही, त्यामुळे आहे त्या जागेत पार्किंगची योग्य सुविधा उपलब्ध करणे हे पालिकेसाठी मोठे शिवधनुष्यच ठरले होते. पण फोंडा पालिका आणि फोंडा वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पार्किंगमध्ये शिस्त आणण्यात फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यशस्वी ठरले आहेत.

Ponda Parking
Banastari Accident Case: मेघना सावर्डेकरच्या जबान्यांमध्ये तफावत

फोंड्यात पार्किंगची समस्या फार पूर्वीपासून आहे. वाढलेली वाहने शहराच्या पोटात कशी घ्यायची आणि सुरळीत वाहतूक कशी करायची हा फार मोठा प्रश्‍न फोंडा पालिकेसमोर आहे. योग्य पार्किंग झाल्यास वाहतूक सुरळीत तर होईलच, शिवाय वाहनांची गर्दीही होणार नाही, हे लक्षात घेऊन फोंडा पालिकेने दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याचे ठरविले. आठ महिन्यांपूर्वी अशा प्रकारची कार्यवाही करण्याचे ठरल्यानंतर लगेच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या सुयोग्य पार्किंगसाठी ‘मार्किंग’ करण्यात आले आणि या मार्किंगमध्येच वाहने पार्क करण्यासंबंधी सक्ती करण्यात आली.

पे पार्किंगची होती योजना

साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी फोंडा शहरात पे पार्किंगची योजना आखण्याचे ठरविण्यात आले होते. तत्कालीन नगराध्यक्ष दामोदर नाईक यांच्या कारकिर्दीत फोंड्यातील वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हा विचार पुढे आला. मात्र पे पार्किंगची योजना सुरू केल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक ज्या ठिकाणी शुल्‍क नाही, अशा ठिकाणी वाहने पार्क करू लागले. त्यामुळे या योजनेला तसा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच ही योजना नंतर बंद करण्यात आली.

Ponda Parking
Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खूनप्रकरणातील आरोपी बिद्रे दाम्पत्यांचे 4 बॅंकांचे ‘डिफॉल्टर’

प्रत्येकाकडे दोन वाहने!

फोंडाच नव्हे तर राज्यात प्रत्येकाकडे किमान दोन वाहने आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणातील वाहने रस्त्यावर आल्यावर वाहतूक कोंडी ही होणारच. शिवाय शहर परिसरात वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न उद्‌भ‌वणार हे ठरलेले आहे. पण फोंडा पालिकेने त्‍यावर नियंत्रण मिळविले आहे.

दिवसभर वाहने पार्क

फोंड्याहून पणजी किंवा मडगाव तसेच वेर्णा आदी ठिकाणी कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांकडून फोंडा शहरात जुन्या बसस्थानक परिसरात दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सकाळी पार्क केलेली ही वाहने संध्याकाळी काढली जातात. त्यामुळे अशा वाहनांची संख्याही वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com