Goa News: साखळी पालिकेत राडा; त्यावर नगराध्‍यक्ष राजेश सावळ यांचे स्पष्टीकरण

सूचना टाकण्याचा माझा मुख्य हेतू पालिकेला महसूल मिळवून देणे हा होता, जेणेकरून पालिका साखळी पंचायत क्षेत्रातील विकासकामे करण्याच्या स्थितीत असेल. साखळीचे नगराध्‍यक्ष राजेश सावळ यांनी स्पष्ट केले.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa News: सूचना टाकण्याचा माझा मुख्य हेतू पालिकेला महसूल मिळवून देणे हा होता, जेणेकरून पालिका साखळी पंचायत क्षेत्रातील विकासकामे करण्याच्या स्थितीत असेल. तसेच सर्व काही कायदेशीर होऊ शकेल, असे साखळीचे नगराध्‍यक्ष राजेश सावळ यांनी स्पष्ट केले.

साखळी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सावळ यांनी सांगितले की, आम्ही कार्यकर्ता म्हणून नव्हे तर अधिकारी म्हणून काम करू. यावेळी शिरगावकर आक्रमक झाले व पुढील प्रसंग घडला. ते त्यांच्या केबिनमध्ये घडलेल्या घटनेचे वर्णन करत होते.

ज्यात बॅनरवरून वाद झाला होता, जो त्यांच्यात आणि मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांच्यात झाला आणि परिणामी दोघांकडून डिचोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली.

सावळ म्हणाले की, जेव्हा त्यांनी सर्वत्र बॅनर पाहिले तेव्हा त्यांनी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता इनवर्ड क्रमांक 5131 खाली सर्व बॅनरस काढण्याविषयीची सूचना लावली. कारण ते लावण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. सकाळी अकराच्या सुमारास वादावादी झाल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लोकांनी बॅनर शुल्क भरले असले तरी या घटनेनंतर सकाळी 11.45 ते 12.15 दरम्यान भरले गेले व त्याचा इनवर्ड क्रमांक 5132 असा होता.

ते पुढे म्हणाले की हे शुल्क अगोदरच भरले असते तर कालच्या भांडणाचा प्रसंगच उद्घभवला नसता. या पत्रकार परिषदेला धर्मेश सगलानी, राया पार्सेकर, ज्योती ब्लेगन, राजेंद्र आमशेकर, अन्सिरा खान आदी उपस्थित होते.

Goa News
Goa Environment: नंदा तळ्याला ‘रामसर’ दर्जा बहाल

मुख्‍याधिकाऱ्यांनी विश्‍‍वासात घेतले नाही

मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याला व इतर पालिका सदस्यांना विश्वासात न घेता व्यापारी, स्थानिकांना नोटीस बजावल्याचा आरोप सावळ यांनी केला. ते म्हणाले की साखळीमध्ये असलेली घरे पोर्तुगीज काळातील आहेत आणि ती कायदेशीर आहेत.

विक्रेत्यांनी चालवलेला व्यवसायही कायदेशीर आहे आणि त्यामुळे आपण साखळीतील लोकांसोबत आहोत आणि त्यांना त्रास देऊ इच्छित नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

KC Venugopal Goa
Colombo High Court Sentences 15 Convicts to 220 Years
Mahikavati Bakhar History
Maharashtra Crime News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com