Mayem Welfare Anniversary Association : बलशाही देश घडविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक - श्रीपाद नाईक

श्रीपाद नाईक : विद्यार्थ्यांसह महिला नाट्यकलाकारांचा गौरव
Shripad Naik
Shripad Naikdainik gomantak
Published on
Updated on

मये : आम्हाला एक बलशाली देश घडवायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले, तर हे घडू शकते. स्वतःचा विकास साधताना, गावचा विकास, राज्याचा विकास आणि पर्यायाने देशाचा विकास होत असतो, असे उद्‍गार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी मये येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले

शारदानगर, केळबाईवाडा, मये येथील शारदा वेल्फेअर असोसिएशनचा १९ वा वर्धापनदिन आणि श्री हनुमान देवस्थानचा प्रतिष्ठापनादिन सोहळ्यात नाईक बोलत होते. व्यासपीठावर प्रेमेंद्र शेट, सरपंच सुवर्णा चोडणकर, शारदा वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर मणेरकर, सचिव पुरुषोत्तम सूर्लकर उपस्थित होते. यावेळी विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Shripad Naik
World Animal Welfare Day: 'हे' आहेत जगातील सर्वात विचित्र प्राणी

मये मतदार संघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. गावाच्या संदर्भात कुणाच्या समस्या असतील, तर त्या योग्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोचवा, असे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी लोकांना आवाहन केले. श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त शारदानगर-मयेच्या महिलांनी संगीत अमृत मोहिनी हे नाटक सादर केले. त्या कलाकारांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Shripad Naik
Maye News : मयेत माल्याच्या जत्रेचा वाद चिघळला

‘काणी एका युगाची’ सादर

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कलाचेतना वळवई निर्मित आणि राजदीप नाईक प्रस्तुत ‘काणी एका युगाची’ हे कोकणी नाटक सादर करण्यात आले. नाट्यकलाकार राजदीप नाईक यांचाही या कार्यक्रमात गौरव श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन वनिता पाटील यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com