Paira Mining: 'कामकाज बंद ठेवा'! पैरावासीय आक्रमक; पंचायतीची साळगावकर खाण कंपनीला नोटीस Watch Video

Salgaokar Mining Company: ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानुसार पंचायतीने हे कडक पाऊल उचलले आहे. सोमवारी सायंकाळी सरपंच विशांत पेडणेकर यांच्या सहीनिशी ही नोटीस काढण्यात आली आहे.
Paira Mining Issue
Paira Mining IssueDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानुसार बेकायदेशीरपणे कामकाज सुरु असल्याचा ठपका ठेवत खनिजखाण बंद ठेवा, अशी नोटीस मये पंचायतीने पैरा येथील साळगावकर खाण कंपनी विरोधात जारी केली आहे.

ही नोटीस संबंधित कंपनीला देण्यात येणार आहे. या नोटीसीची प्रत मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांसह संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानुसार पंचायतीने हे कडक पाऊल उचलले आहे. सोमवारी सायंकाळी सरपंच विशांत पेडणेकर यांच्या सहीनिशी ही नोटीस काढण्यात आली आहे. सायंकाळी ही नोटीस घेवून पंचायतीचे कर्मचारी साळगावकर खाणीवर गेले होते. मात्र, कार्यालय बंद राहिल्याने ही नोटीस संबंधित कंपनीला देता आली नाही. मात्र, मंगळवारी सकाळी ही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती पंचायतीकडून मिळाली आहे.

Paira Mining Issue
Sand Mining: वाळू उपसा प्रश्‍न! जीसीझेडएमएला 50 हजारांचा दंड; उत्तर सादर न केल्याने एनजीटीची कारवाई

ग्रामस्थांची धडक

ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानुसार आज दुपारी साडेतीन वाजता पैरावासिय पैरा जंक्शनवर जमले होते. त्यांच्याबरोबर स्थानिक पंचसदस्य विनिता पोळे होत्या. मात्र, अन्य पंचसदस्य त्याठिकाणी फिरकले नाही. बराचवेळ पंचायत मंडळाची वाट पाहून नाराज झालेल्या पैरावासियांनी मये पंचायतीवर धडक दिली. त्याठिकाणीही सरपंच आणि अन्य पंचसदस्य उपस्थित नव्हते. त्यामुळे लोक पंचायत सचिवांना भेटले. त्यांनी त्यापूर्वी तयार केलेल्या नोटीसीला पैरावासियांनी हरकत घेत, काम बंद ठेवण्याबाबत नव्याने नोटीस काढण्यास सांगितले. नंतर पैरा येथे गेलेल्या सरपंच विशांत पेडणेकर यांची पैरावासियांनी भेट घेवून खाण बंद करा, अशी मागणी केली.

Paira Mining Issue
Goa Mining: '..अन्यथा खाणपट्टा बोलीला फटका'! निर्यातदार संघटनेचा इशारा; लोहखनिज निर्यातीवर शुल्क जाचक असल्याचा दावा

मये ग्रामसभेत खाणीचा विषय ऐरणीवर

विविध मागण्या पुढे करून शिरगाव-मये ब्लॉक-२ अंतर्गत येणाऱ्या पैरा येथील साळगावकर खनिज खाणी विरोधात ग्रामस्थ एकवटले. मात्र, कंपनीने कायद्याचा बडगा उगारून आंदोलन मोडीत काढले आहे. रविवारी मये पंचायतीच्या ग्रामसभेत खाणीचा विषय ऐरणीवर आला होता.

खाणीच्या विषयावरुन ग्रामसभा बरीच तापली होती. प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत पैरा येथील खनिज वाहतुकीसह ‘साळगावकर’च्या खाणीवरील कामकाज बंद ठेवा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी करुन पंचायतीवर दबाव आणला. संबंधित खाण कंपनीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस जारी करुन साळगावकरची खाण बंद करण्याचे ठाम आश्वासन पंचायतीने पैरावासियांना दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com