Mayem News : मयेत ‘नीरा’ला मागणी वाढली; ‘जंगल ज्यूस’ अशी ओळख

Mayem News : डिचोलीतील बहुतेक ग्रामीण भागात काजू बोंडूंच्या रसापासून हुर्राक, फेणी ही दारू उत्पादित करण्यात येते.
Mayem
MayemDainik Gomantak

Mayem News :

डिचोली, ‘जंगल ज्यूस’ अशी ओळख असलेल्या आणि काजू बोंडूंच्या रसापासून मिळणाऱ्या ‘नीऱ्या’ला मागणी वाढल्याचे आढळून येत आहे. मये भागात तर गेल्या काही दिवसांपासून रोज सायंकाळच्या वेळी रस्त्याच्या बाजूने ‘नीरा’ विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.

डिचोलीतील बहुतेक ग्रामीण भागात काजू बोंडूंच्या रसापासून हुर्राक, फेणी ही दारू उत्पादित करण्यात येते. ‘नीरा’ हा दारूचा प्रकार नसला, तरी ज्याप्रमाणे पहिल्या धारेच्या ‘हुर्राक’ला मागणी असते. त्याचप्रमाणे दारू गाळणीच्या प्रक्रियेपूर्वी काजू बोंडूंच्या रसापासून मिळणाऱ्या ‘नीऱ्या’ला मागणी असते. स्वच्छ असल्याने पचनक्रिया आणि आरोग्यास हा ‘नीरा’ उपयुक्त ठरतो.

काजू बोंडू मळून झाल्यानंतर बोंडूंचा चोथा एकत्रित करून झाल्यानंतर मोठा दगड किंवा यंत्रात घालून मळलेला चोथा चेपण्यात येतो. त्यानंतर रसाची निघणारी शेवटची धार त्यालाच ‘नीरा’ असे संबोधले जाते.

गेल्या काही वर्षांपासून काजू व्यवसायात मळणी आदी यंत्रांचा वापर होऊ लागल्यानंतर काजू बोंडू पायाने मळण्याचे प्रकार कमी झाले आहेत. त्यामुळे काजू उत्पादकांचे श्रमही वाचले आहेत. मात्र, मये भागात अजूनही काही काजू व्यावसायिक काजू बोंडूंची पायाने मळणी करतात. त्यामुळे मये गावात ‘नीरा’ सहज उपलब्ध होत आहे.

Mayem
South Goa: 48 तासांत उत्तर द्या! निवडणूक अधिकार्‍याने आप आमदाराला कारणे दाखवा नोटीस का बजावली?

मयेत ‘नीरा’ सहज उपलब्ध होत असल्याने गावातील महिलांसह बहुतेकजण ‘नीऱ्या’च्या विक्री व्यवसायात आहेत. सायंकाळच्यावेळी तर मये तलावाजवळून नार्वेच्या दिशेने गेलेल्या रस्त्याच्या बाजूने महिला मिळून स्थानिक ‘नीऱ्या’ची विक्री करताना आढळून येतात. त्यात पंधरा ते वीस महिलांचा समावेश असतो.

१०० रुपये लिटर याप्रमाणे ‘नीऱ्या’ची विक्री करण्यात येत आहे. या रस्त्याने ये-जा करणारे वाहने थांबवून ‘नीरा’ विकत घेतात. काहीजण खास ‘नीरा’ विकत घेण्यासाठीच येथे येतात. ‘नीऱ्या’च्या विक्रीतून स्थानिक महिलांची आर्थिक कमाई होते. यंदा काजू पिकावर परिणाम झाल्याने ‘नीऱ्या’चे प्रमाणही कमी असल्याचे दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com