Goa Colvale Jail: कोलवाळ कारागृहात विदेशी महिला कैद्यांकडून मेट्रनना जबर मारहाण

कोलवाळ कारागृह तिथे घडणाऱ्या घटनांनी नेहमीच चर्चेत असते. सध्या कोलवाळ कारागृहातून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
जयश्री वेंगुर्लेकर
जयश्री वेंगुर्लेकरDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: कोलवाळ कारागृह तिथे घडणाऱ्या घटनांनी नेहमीच चर्चेत असते. सध्या कोलवाळ कारागृहातून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विदेशी महिला कैद्यांकडून जयश्री वेंगुर्लेकर या मेट्रनना जबर मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान जखमी वेंगुर्लेकर मेट्रनना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी 10 वाजता घडली आहे. या घटनेसंबंधित अधिक तपास सुरू आहे.

जयश्री वेंगुर्लेकर
Goa Jetty Policy: गोव्याच्या शुद्ध नद्या भांडवलदारांच्या घशात घालू नका

3 नायजेरियन महिलांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिला जोरदार धक्का दिला; यामुळे तुरुंग कर्मचाऱ्यांनी वेंगुर्लेकर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात म्हापसा येथे हलवले दरम्यान त्या रुग्णालयात बेशुद्ध झाल्या; राज्य मध्यवर्ती कारागृहात मेट्रन म्हणून काम करणाऱ्या जयश्री वेंगुर्लेकर यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोलवाळ कारागृहात रक्षकाला मारहाण..

कोलवाळ मध्यवर्ती कारागृह सारखे तेथील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील हाणामारीमुळे प्रकाशझोतात येत असते. काही दिवसांपूर्वी कारागृहाच्या जेलरने मद्यधुंद अवस्थेत एका तुरुंग रक्षकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. हा प्रकार रात्री घडला असला तरी याला दुजोरा मिळालेला नाही. या घटनेनंतर जखमी तुरुंग रक्षकाला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. उपचारानंतर त्याला शनिवारी सकाळी घरी पाठविण्यात आले होते.

कोलवाळ कारागृहात एका नायजेरियन कैद्याचा कान चावण्याचा प्रकार

काही दिवसांपूर्वीच येथील कैद्यांमध्ये हाणामारी होऊन एका नायजेरियन कैद्याचा कान चावण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी येथील चौदा कैद्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. यापूर्वीही कैद्यांमध्ये जबर हाणामारी तसेच प्राणघातक हल्ल्यांचे प्रकार घडले होते.कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अशा प्रकारची घटना घडली आहे का, अशी विचारणा केली असता, अशा प्रकारची तक्रार तुरुंग प्रशासनाकडून आमच्याकडे आलेली नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक यांनी दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com