Katar Airways
Katar Airways

Katar Airways: दाबोळीला झटका! कतार एअरवेज जूनपासून मोपावर स्थलांतरीत करणार ऑपरेशन्स

Katar Airways: कतार एअरवेज जूनच्या मध्यापासून त्यांची ऑपरेशन्स मोपावर स्थलांतरित करणार असल्याची माहिती आहे.

Katar Airways

दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ बंद होईल, अशी भीती विरोधी पक्षातील आमदारांकडून व्यक्त केली जात असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कतार एअरवेज जूनच्या मध्यापासून त्यांची ऑपरेशन्स मोपावर स्थलांतरित करणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कतार एअरवेज त्यांची ऑपरेशन्स येत्या 20 जूनपासून दक्षिणेतील दाबोळी विमानतळावरून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळवर स्थलांतरित करणार आहेत.

कतार एअरवेज हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दाबोळीसाठी 19 जून रोजी अखेरचे उड्डाण करेल तर, 20 जून रोजी दाबोळीवरुन कतारसाठी अखरेचे उड्डाण होईल. त्यानंतर कतार एअरवेजचे सर्व ऑपरेशन्स मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होतील, अशी माहिती आहे.

Katar Airways
वास्को, सावर्डे रेल्वे स्थानकांचा होणार विकास; दक्षिणेत मोदींच्या हस्ते 155.37 कोटींच्या कामांचे उद्घाटन

दाबोळी विमानतळ घोस्ट विमानतळ होईल असे भीती विरोधी पक्षातील आमदारांकडून व्यक्त केली जात आहे. दाबोळीवर येणाऱ्या विमान उड्डाणांची संख्या कमी झाली असून, मोपावर त्याचा ओघ वाढल्याचा आरोप केला जात आहे.

जीएमआर कंपनी दाबोळी विमानतळ प्रशासनावर दबाव निर्माण करत असल्याचा आरोप देखील केला जात असून, दाबोळीचे हळुहळू महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप आमदार वेंझी व्हिएगस यांनी केला होता. तसेच, आमदार विजय सरदेसाई यांनी देखील याबाबत भीती व्यक्त केली होती.

दरम्यान, कतार एअरवेजने ऑपरेशन्स स्थलांतरित केल्याने दाबोळीसाठी हा धक्का मानला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com