Goa Fire News: शिवोलीत घराला आग अन् डिचोलीत सुक्या कचऱ्याने घेतला पेट

Fire News: डिचोली बसस्थानकाजवळील बगलमार्गालगत पडलेल्या कचऱ्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना आज (१५ फेब्रुवारी ) घडली. तर दुसरीकडे, शिवोलीमधील दांडा येथे एका घराला अचानक आग लागली आहे.
Goa Fire News
Goa Fire NewsDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली/शिवोली: डिचोली बसस्थानकाजवळील बगलमार्गालगत पडलेल्या कचऱ्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना आज (१५ फेब्रुवारी ) घडली. तर दुसरीकडे, शिवोलीमधील दांडा येथे एका घराला अचानक आग लागल्याची माहिती समोर आलीय.

डिचोली बसस्थानकाजवळील बगलमार्गालगत पडलेल्या कचऱ्याला अचानक लागलेल्या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सुक्या कचऱ्यामुळे आगीने वेग घेतला आणि काही वेळातच मोठ्या भागात पसरली.

घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

Goa Fire News
Goa Bhavan Ayodhya: श्री रामलल्लाच्या अयोध्यानगरीत उभे राहणार 'गोवा भवन'! सरकारकडून गतिमान हालचाली; भूखंड निश्चित

तीन तासांनी आग आटोक्यात

अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी तब्बल तीन तासांचा कालावधी लागला. या दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही सहकार्य करून आग विझवण्यास मदत केली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात धूर पसरल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

या प्रकारानंतर स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आणि योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं आवाहन केलं आहे.

Goa Fire News
Goa Education: शालेय पुस्तके वेळेवर उपलब्ध होणार! संचालकांनी दिली खात्री; जुनी की नवीन यावरून पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

शिवोलीमध्ये घराला आग

दुसरीकडे, शिवोलीमधील दांडा येथे एका घराला अचानक आग लागली. या दुर्घटनेत ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले.

अग्निशमन दलानं वेळेत घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रशासनानं नुकसानीचा आढावा घेतला असून अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com