संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद! रुमडामळ येथे पार पडली महत्वाची पत्रकार परिषद, ट्रस्ट, भाविक काय म्हणाले?

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue Dispute: सध्या रुमडामळ येथील श्री मारुती मंदिर ट्रस्ट व छत्रपती संभाजी महाराज प्रेमी यांच्यामध्ये वाद सुरू आहे
Chhatrapati Sambhaji Maharaj Statue Dispute: सध्या रुमडामळ येथील श्री मारुती मंदिर ट्रस्ट व छत्रपती  संभाजी महाराज प्रेमी यांच्यामध्ये वाद सुरू आहे
Maruti mandir trust Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: शनिवारी मारुती मंदिर ट्रस्ट, भाविक व सेवेकरी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद सामोपचाराने सोडविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.

त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी जो काय निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल, असे या पत्रकार परिषदेला उपस्थित जगन्नाथ भटजी, अक्षय शिरवईकर, अवधुत जुवारकर, रवी पटेल, नितीन प्रभू आजगावकर, गिरीधर प्रभू यांनी सांगितले.

सध्या रुमडामळ येथील श्री मारुती मंदिर ट्रस्ट व संभाजी महाराज प्रेमी यांच्यामध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद सुरू आहे. हे प्रकरण सध्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गटांतील प्रतिनिधींना बोलावून त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मारुती मंदिर ट्रस्टकडून काही प्रस्ताव आले. आता पुढील बैठकीत यावर निर्णय होणार आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue Dispute: सध्या रुमडामळ येथील श्री मारुती मंदिर ट्रस्ट व छत्रपती  संभाजी महाराज प्रेमी यांच्यामध्ये वाद सुरू आहे
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचा प्रश्नच येत नाही! जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मान्य करु

पुतळा त्याच जागेत, पण दुसरीकडे हलवावा

आम्ही शिवाजी व संभाजी महाराजांचे भक्त आहोत. त्यामुळे आमची केवळ एक विनंती आहे व ती म्हणजे संभाजी महाराजांचा पुतळा त्याच जागेत; पण दुसरीकडे हलवावा. सध्याच्या जागेत असलेल्या या पुतळ्यामुळे दर शनिवारी मंदिराच्या होणाऱ्या पालखी उत्सवावेळी स्तंभाच्या सभोवताली परिक्रमा करता येत नाही.

पालखी उत्सवात केवळ पालखीच नसते तर त्यासोबत हजारो भाविकही असतात, असे अक्षय शिरवईकर, रवी पटेल, नितीन प्रभू आजगावकर यांनी सांगितले. ही अडचण फेब्रुवारी महिन्यात संभाजी महराजांचा पुतळा उभारला तेव्हापासून होत आहे. त्यामुळे पालखीसोबत असलेले भाविक, भक्तगण, सेवेकरी दुखावतात, असे यावेळी सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com