Valpoi News : महिलांना रोजगाराची संधी देणारा ‘बाजार डे’ उपक्रम : दीपा परब

Valpoi News : ठाणे-सत्तरी येथे सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिलांतर्फे ठाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात आयोजिलेल्या ‘बाजार डे’च्या उदघाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यासाठी गोवा राज्य ग्रामीण जीवन अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून ठाणे येथील महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनण्यासाठी टाकलेले हे पाऊल प्रेरणादायी आहे.

येणाऱ्या काळात ‘बाजार डे’च्या माध्यमातून आर्थिक फायदा होऊन ग्रामीण उत्पादनांना हक्काचे स्थान प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन सत्तरी गटविकास कार्यालयाच्या अधिकारी दीपा परब यांनी केले.

ठाणे-सत्तरी येथे सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिलांतर्फे ठाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात आयोजिलेल्या ‘बाजार डे’च्या उदघाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Valpoi
Goa: गोव्यात बस प्रवासादरम्यान महिलांसोबत विनयभंगाचे प्रकार, सुरक्षा पुरविण्याची आवदा यांची मागणी

यावेळी उत्तर गोवा राज्य अभियानच्या व्यवस्थापक सुनैना हळर्णकर, आशिष नाईक, शैली धावस्कर, स्थानिक पंच सदस्य सरिता गावकर, ग्रामीण अभियानच्या प्रणिशा गावकर, श्‍यामल गावस, प्रवीणा गावकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी सुनैना हळर्णकर, आशिष नाईक, श्‍यामल गावस यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने बाजाराला भेट घेऊन साहित्य खरेदी केले. स्वागत श्‍यामल गावस यांनी केले, तर प्रणिशा गावकर यांनी आभार मानले.

Valpoi
Goa Crime News : दोन अल्पवयीन मुलींवर गोव्यातील हॉटेलमध्‍ये लैंगिक अत्याचार, एकाला अटक

२१ सेल्फ हेल्प ग्रुपचा सहभाग

‘बाजार डे’मध्ये ठाणे पंचायत क्षेत्रातील २१ सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिलांचा सहभाग होता. महिलांनी तयार केलेले साहित्य येथे विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यात खास करून पापड, लोणचे, मसाले, चिप्स, खोबरेल तेल, आंबे, फणस, झाडू, हस्तकलेच्या वस्तू, बांबूपासून बनविलेले विविध प्रकारचे साहित्य, सुपली, टोपली, कपडे, भाजी, कोकम सोले व इतर साहित्य उपलब्ध होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com