Margao Road Closed : मडगाव रिंगरोड सुशोभीकरणाचे काम ठप्प! रस्ता पुन्हा सुरू करण्याचे नागरिकांचे आवाहन

कोकण रेल्वे स्थानक ते पॉवर हाऊस जंक्शनपर्यंतचा रिंगरोड बंद करण्याचा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी मडगाव येथील नागरिकांच्या गटाने मंगळवारी केली.
Margao Road Closed
Margao Road ClosedDainik Gomantak
Published on
Updated on

कोकण रेल्वे स्थानक ते पॉवर हाऊस जंक्शनपर्यंतचा रिंगरोड बंद करण्याचा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी मडगाव येथील नागरिकांच्या गटाने मंगळवारी केली.

पत्रकारांना संबोधित करताना, मडगावसाठी सावली परिषदेचे निमंत्रक, सॅवियो कुतीन्हो म्हणाले की, रस्ता बंद करण्याच्या मागणीसाठी परिषदेचा कोणताही ठराव नाही.

Margao Road Closed
Panjim Municipality: महापालिकेचा कारभार होणार स्थलांतरित

जिल्हाधिकाऱ्यांकडून आरटीआय कायद्यांतर्गत मिळालेली माहिती दाखवून कुतीन्हो म्हणाले की, रिंगरोडच्या बाजूने सुरू करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामासाठी जिल्हाधिकारी आणि वाहतूक कक्षाकडून रस्ता बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. तथापि, 24 नोव्हेंबर रोजी आदेश लागू झाल्यापासून, या भागात कोणतेही काम प्रगतीपथावर नाही.

गेल्या दोन महिन्यांपासून इथे कोणतेही बांधकाम सुरू नाही; म्हणून, हा मार्ग 22 मे 2023 पर्यंत बंद ठेवणे पूर्णपणे मूर्खपणाचे असल्याचे खंडेबोल त्यांनी यावेळी सुनावले.

अॅड स्नेहल ओंस्कर म्हणाल्या की, एमएमसीचे अध्यक्ष, जे संयोगाने वॉर्ड काउन्सिलर देखील आहेत, ते म्हणतात की लोक रस्ता बंद झाल्यामुळे आनंदी आहेत. त्यांचे हे विधान लक्षात घेणे अधिक मनोरंजक आहे.

रिंग रोडची रचना 1985-90 मध्ये झाली होती आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी जवळपास 30 वर्षे मडगावचा कारभार सांभाळला असला तरी ते पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत, असे कुतीन्हो शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com