Margao: मडगाव पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीप्रकरणी एकाला अटक, दीड लाखांचा माल हस्तगत

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान फोडून वस्तू चोरणाऱ्या समीर बेपारी चोरट्याला मडगाव पोलीसांनी अटक केलीय.
Margao
MargaoDainik Gomantak

पेडा खारेबांध येथील एक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान फोडून मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरणाऱ्या समीर बेपारी (३२) या मूळ हुबळी येथील चोरट्याला मडगाव पोलीसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेला सुमारे दीड लाखांचा माल जप्त केला. या चोरीत त्याला साथ देणारा बाबू मराठे हा सध्या फरार असून पोलीस त्याच्या शोधत असल्याची माहिती मडगाव येथील पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

काल मडगाव पोलिसात शुभम बोरकर या दुकानदाराने तक्रार दिली होती. त्यात त्याच्या दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरल्याचे म्हटले होते. यावेळी दुकान मालकाने सीसी टीव्ही कॅमेऱ्याची चित्रफीत पोलीसांना सादर केली होती. त्यातून ही चोरी बेपारी याने केल्याचे पोलीसांना कळून आल्यावर तीन वेगवेगळी पथके तयार करून त्यांचा शोध घेतला असता एक संशयित त्यांना सापडला.

Margao
Fraud: 17 कोटी रुपयांच्या लोहखनिज फसवणूक करून विकले, FIR दाखल

निरिक्षक नाईक यानी दिलेल्या माहितीनुसार या चोरट्यांच्या दुक्कलीने या पूर्वीही अशा चोऱ्या केल्या असून २०२० मध्येही त्यांना पकडण्यात आले होते. समीर बेपारी हा हुबळी येथे रहात असून अधूनमधून तो मडगाव येथे येतं होता. मडगाव येथे अशा भुरट्या चोऱ्या करून तो परत हुबळीला निघून जात अशी माहिती मिळाली आहे. या चोरट्यांचा आणखी काही चोऱ्यात हात आहे याची चौकशी पोलीस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com