Margao News : कारे कायदा महाविद्यालय देशात चौथे; ‘कॉम्पिटेशन सक्‍सेस रिव्‍ह्यू’ मासिकाच्‍या सर्व्हेक्षणात पुरस्‍कार

Margao News : या पुरस्‍काराबद्दल या महाविद्यालयाची पालक संस्‍था असलेल्‍या विद्या विकास मंडळाचे अध्‍यक्ष नितीन कुंकळयेकर यांनी महाविद्यालयाच्‍या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
Margao
MargaoDainik Gomantak

Margao News :

मडगाव, 'कॉम्पिटेशन सक्‍सेस रिव्‍ह्यू’ या मासिकाने केलेल्‍या देशव्‍यापी सर्व्हेक्षणात मडगावच्‍या गोविंद रामनाथ कारे कायदा महाविद्यालयाला पश्चिम विभागातील भारतातील चौथ्या क्रमांकाचे कायदा विद्यालय म्‍हणून स्‍थान प्राप्‍त झाले आहे, तर हे महाविद्यालय गोव्‍यातील सर्वोत्तम यावरही या सर्व्हेक्षणात शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले आहे.

यासंबंधी नवी दिल्‍लीत झालेल्‍या समारंभात महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्य डॉ. मारिया गोरेटी सिमॉईश यांनी हे पुरस्‍कार स्वीकारले.

‘कॉम्पिटेशन सक्‍सेस रिव्‍ह्यू’ मासिकाचे हे ६० वे वर्ष असून हे मासिक नागरी सेवा, एमबीए आणि बँकिंग यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. देशातील चालू घडामोडी आणि विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांच्या संबंधित बाबींसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत लोकप्रिय मासिक आहे. आपल्‍या हीरक महोत्‍सवी प्रकाशन वर्षानिमित्त या मासिकाने हे देशव्‍यापी सर्व्हेक्षण हाती घेतले होते.

Margao
Goa Daily Update: अवकाळीची हजेरी, पणजीत दाणादाण, तेरेखोल येथे खून; गोव्यातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

जीआरके ज्युडिशियरी टॉक्स या मालिकेखाली या महाविद्यालयाने अनेक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कायद्याच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे. महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही पारितोषिके पटकावली आहेत.

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी वरिष्ठ अधिवक्ता मनोहर उसगावकर सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली आहे.

अखिल गोवा न्यायिक परीक्षेला बसणाऱ्या कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज ओरिएंटेशन कोर्स आयोजित करत आहे, अशी माहिती विद्या विकास मंडळाचे अध्‍यक्ष नीती कुंकळयेकर यांनी दिली.

महाविद्यालयाच्‍या शिक्षकांचे अभिनंदन

या पुरस्‍काराबद्दल या महाविद्यालयाची पालक संस्‍था असलेल्‍या विद्या विकास मंडळाचे अध्‍यक्ष नितीन कुंकळयेकर यांनी महाविद्यालयाच्‍या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. कारे कायदा महाविद्यालय राज्यात कायदेशीर शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी अनेक सक्रिय पावले उचलत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com