Margao News : ‘मुलांना सकारात्मकतेकडे नेणे पालकांची जबाबदारी’ : नेहा दुकले

Margao News : याप्रसंगी मुष्टिफंड संस्थेचे पदाधिकारी दिलीप धारवाडकर, डॉ. अजय वैद्य, जयराम प्रभू खोलकर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष हनुमंत च्यारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा धारवाडकर, पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रमुख निशा प्रभुदेसाई उपस्थित होते.
Margao
Margao Dainik Gomantak

Margao News :

मडगाव, फास्ट फूडच्या युगात मुलांना सकस आहार देणे खूप गरजेचे आहे. या शिवाय मुलांच्या वागणुकीतून नाही, हा शब्द कमी करून होय हा शब्द ऐकण्याची सवय लावावी.

चांगल्या सवयी लावण्यासाठी मुलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून पालकांनी आपल्याला हवे ते कसे साध्य करून घावे, असे प्रमुख वक्त्या नेहा पै दुकले यांनी सांगितले.

श्री सरस्वती पूर्व प्राथमिक विद्यालयाची नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात मुलांच्या स्वागताने झाली. याप्रसंगी नेहा पै दुकले यांनी पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

Margao
Goa Hit And Run: 'शरीराचा चेंदामेंदा, डोके आढळले 1 किलोमीटर लांब', उसगावात हिट अँड रनमध्ये एक ठार

याप्रसंगी मुष्टिफंड संस्थेचे पदाधिकारी दिलीप धारवाडकर, डॉ. अजय वैद्य, जयराम प्रभू खोलकर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष हनुमंत च्यारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा धारवाडकर, पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रमुख निशा प्रभुदेसाई उपस्थित होते.

डॉ. अजय वैद्य यांनी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेण्याचे महत्त्व पालकांना सांगितले. पर्यावरण दिनाच्या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या हस्ते रोपटे देऊन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com