

मडगाव: ‘दहावीची परीक्षा झाल्यानंतर मोबाईल देऊ’, असे पालकांनी सांगितल्यानंतर तो न दिल्याने १८ वर्षीय विद्यार्थ्याने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. सध्या या विद्यार्थ्यावर गोमेकॉतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा सधन कुटुंबातील आहे. हल्लीच त्याने दहावीची परीक्षा देऊन तो उत्तीर्ण झाला होता. त्याने दहावीनंतर मोबाईलचा हट्ट धरला होता. मात्र, तो न दिल्याने त्याने गुरुवारी दुपारी पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली.
यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला प्रथम दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर त्याला गोमेकॉत हलविले.
सध्या तो पोलिसांच्या निगराणीखाली असून, त्याची जबानीही नोंदवून घेता आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली. उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.