मडगाव रेल्वे स्थानकावरील वाहन शुल्कावरुन वाद पेटला, टॅक्सी चालकाला मारहाण; पोलीस घटनास्थळी

शुल्क द्यावेच लागेल यावरुन दोघांमध्ये जुंपली आणि तेथील कर्मचाऱ्यांनी चालकाला मारहाण केली, असे स्थानिकांनी सांगितले.
Margao Railway Station Pay Parking
Margao Railway Station Pay Parking
Published on: 
Updated on: 

Margao Railway Station Pay Parking: मडगाव स्थानकात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांकडून शुल्क आकारणी सुरु केली आहे. यावरुनच आज (सोमवारी, दि.04) पार्किंग स्थळावरुन कर्मचारी आणि टॅक्सीचालक यांच्यात वाद झाला.

यात टॅक्सी चालकाला मारहाण करण्यात आली. परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कारचालक पार्किंग क्षेत्रात गेला, हिशोब करुन तो पाच ते सहा मिनिटात बाहेर आला, मात्र बाहेर पडताना त्याच्याकडे शुल्काची मागणी केली.

पार्किंग दहा मिनिटासाठी मोफत असल्याचे कार चालकाने सांगितले. पण शुल्क द्यावेच लागेल यावरुन दोघांमध्ये जुंपली आणि तेथील कर्मचाऱ्यांनी चालकाला मारहाण केली, असे स्थानिकांनी सांगितले.

दरम्यान, यावरुन रेल्वे स्थानक परिसरात मोठा गोंधळ झाला आणि परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.

स्थानकावर सुरु असलेली शुल्क आकारणी बेकायदेशीर असून, लहान लोकांकडून लूट केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केली. पूर्वी याबाबत आंदोलन देखील करण्यात आले होते. शुल्क आकारणीचे कंत्राट रद्द केले जावे अशी मागणी स्थानिकांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com