Goa Theft: दरोडा टाकण्यासाठी २३ जुलै रोजी ही टोळी बंगळुरू येथून मडगावात आली होती
Goa Police Canava

Goa Crime: दिवसाढवळ्या सराफी दुकान लुटण्याचा कट रचणाऱ्या 'त्या' टोळीविरोधात गुन्हा दाखल

Goa Theft: दरोडा टाकण्यासाठी २३ जुलै रोजी ही टोळी बंगळुरू येथून मडगावात आली होती
Published on

मडगाव: नावेली येथील एका सराफी दुकानावर दिवसाढवळ्या दरोडा घालून ते लुटण्याचा कट रचलेल्या त्या राजस्थानी टोळीविरोधात मडगाव पोलिसांनी नव्याने गुन्हा नोंद केला आहे. २५ जुलै रोजी हा दरोडा टाकण्याचा कट रचण्यात आला होता.

याप्रकरणी पोलिसांनी लाडू सिंग, राकेश प्रजापती, गोवर्धन राजपुरोहित, श्यामलाल आणि संदीप जाट (सर्व राहणारे राजस्थान) यांच्याविरोधात भा. न्या. सं. च्या ३१०(४) व १११(३) (सशस्त्र दरोडा टाकण्याचा कट रचणे) या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दरोडा टाकण्यासाठी २३ जुलै रोजी ही टोळी बंगळुरू येथून मडगावात आली होती. त्यांनी नावेली येथील ‘स्टार ज्वेलर्स’ या दुकानावर दरोडा टाकण्याचे ठरविले होते.

यासाठी त्यांनी तीन दिवस मडगाव बाजारातील दत्तराज हॉटेलमध्ये तळ ठोकला होता. गोव्यात येऊन त्यांनी एक बोलेरो आणि एक रेंट ए बाईक भाड्याने घेतली होती. त्यांनी त्यांचा वापर करून या सराफी दुकानांची रेकीही केली होती. २५ रोजी त्यांनी हा दरोडा टाकण्याचे निश्चित केले होते; पण त्यादिवशी या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही.

Goa Theft: दरोडा टाकण्यासाठी २३ जुलै रोजी ही टोळी बंगळुरू येथून मडगावात आली होती
पंधरा महिन्यात दाबोळीवर 22 तर मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 13 किलो सोन्‍याची तस्‍करी

राकेशच्या सांगण्यावरून रचला कट

राकेश प्रजापती याच्या सांगण्यावरून या टोळीने हा दरोड्याचा कट रचला होता. हा कट यशस्वी न झाल्यामुळे त्यांनी परत कर्नाटकला जाण्यासाठी बस पकडली. मात्र, सीमेवरील पोलिसांनी दारूच्या बाटल्या आहेत का, हे तपासण्यासाठी त्यांच्या साहित्याची झडती घेतली असता, त्यांच्याकडे गावठी पिस्तुले सापडल्याने त्यांचा हा कट उघडकीस आला. त्यातील एका संशयिताला कुळे पोलिसांनी तर अन्य तीन संशयितांना अनमोड पोलिसांनी अटक केली होती. सर्व संशयितांना मडगाव पोलिस लवकरच ताब्यात घेणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com