Margao: सायकलवरून 'पाव' विकणाऱ्यांकडे मागितला 50 रुपये सोपो कर! तक्रार करण्‍याचे नगराध्यक्षांचे आवाहन

Margao Poi Vendors: सोपो गोळा करण्याचे अधिकृत कंत्राट ‘बापू’ या व्यक्तीने घेतले असले तरी प्रत्यक्षात अनधिकृत व्यक्ती ही कार्यवाही करत असल्याने शहरात गोंधळ निर्माण झाला आहे.
Margao
MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: सोपो गोळा करण्याचे अधिकृत कंत्राट ‘बापू’ या व्यक्तीने घेतले असले तरी प्रत्यक्षात अनधिकृत व्यक्ती ही कार्यवाही करत असल्याने शहरात गोंधळ निर्माण झाला आहे. पाववाल्यांकडून एकदम ५० रुपये सोपो शुल्क मागणे अन्यायकारक आहे.

कायद्याने लागू असलेला दरच आकारण्याचे आदेश दिले असल्याचे मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले. पाववाल्यांकडून जास्तीत जास्त १० ते २० रुपये सोपो शुल्क घ्यावे.

Margao
Goa Bread History: 1500च्या दशकात पोर्तुगिज आले, भारतात सर्वांत पहिला 'पाव' गोव्यात तयार झाला; इथून तो मुंबईत गेला..

कोणी त्यापेक्षा अधिक रक्कम मागितली किंवा बळजबरी केली तर संबंधित इसमाविरोधात तक्रार करावी आणि शुल्क देऊ नये, असे आवाहनही नगराध्यक्षांनी केले. दरम्‍यान, या विक्रेत्यांकडून जेव्हा ५० रुपये सोपो शुल्क मागण्यात आले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

Margao
Goan Poi: ‘पोळी नाही दिली?’ असे विचारताच पोदेराने गोलाकार पाव काढून हातावर ठेवला; गोव्याचे पारंपरिक देणे

आम्हाला विश्‍‍वासात न घेता अचानक दरवाढ कशी करण्यात आली याचे आश्‍चर्य वाटते. हा दर कायम राहिला तर पावाच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सायकलवरून शहरभर फिरून पाव विकणारे हे लोक एक प्रकारे जनतेची सेवा करत आहेत. त्यांना एवढी रक्कम परवडणारी नाही. त्यांच्या उदरनिर्वाहावर त्याचा परिणाम होईल.

- कोन्सेसांव डिकॉस्‍टा, सरचिटणीस (अखिल गोवा बेकर असोसिएशन)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com