Margao News : 25 लाखांची उधारी फेडण्यासाठी त्यांनी चोरला चक्क ट्रक..!

एकास अटक : तीन फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू
Margao News
Margao NewsGomantak Digital Team
Published on
Updated on

25 लाख रुपयांची उसनवारी फेडण्यासाठी तिघाजणांनी आर्ले - नुवे बायपास येथून एक ट्रकच चोरून नेल्याची घटना पुढे आली असून या प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसांनी कुंकळ्ळी येथील सुनिल धत याला अटक केली आहे. चोरीला गेलेला ट्रक मूळ पंजाब येथील एकाचा असून हा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील अन्य तीन संशयित सध्या फरार असून सध्या त्यांचा शोध चालू आहे.

पोलिस निरीक्षक रवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप पुढील तपास करीत आहेत. पंजाब येथून एक दहा टायरचा ट्रक घेऊन प्लायवूड डिलिव्हरी करण्यासाठी त्या ट्रकचा चालक भागचंद्र नाथ राम हा पंजाबहून महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आला होता. मालाची डिलिव्हरी केल्यानंतर गोव्यातून काही डिलिव्हरी नेण्यास मिळेल का म्हणून तो गोव्यात येत असताना सावंतवाडी - बांदा येथे त्याला बिकास पैहलवान, मोहन रेबाडी व विकी हे तिघेजण भेटले. स्वतःला राजस्थानी म्हणवून घेऊन त्या तिघांनी राम यांच्याशी जवळीक साधली. आमचा काही माल इंदोरला न्यायचा आहे असे त्याला सांगितले. नंतर सर्वजण गोव्यात आले. राम हा पहिल्यांदाच गोव्यात येत होता.

Margao News
Goa Staff Selection Commission: सप्टेंबरमध्ये नोकरभरतीची पहिली जाहिरात; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

आर्ले - नुवे बगलमार्गावर त्याला ट्रक उभी करण्यास सांगितले. माल ज्यांच्याकडून उचलायचा आहे त्याचा फोन लागत नसल्याचेही संशयिताने त्याला सांगितले व नंतर त्याला घेऊन जुने गोवे येथे फ्लॅटवर घेऊन गेले. १७ मे रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर त्याला एक टपाल दाखविण्यात आले. आम्ही कुंडई येथे जात असल्याचे सांगून ते निघून गेले. नंतर ट्रक उभी केलेल्या जागेवर राम हा आला असता, त्याला आपला ट्रक तेथे आढळून आला नाही. त्यावेळी त्याला हा ट्रक कोणी तरी घेऊन गेल्याचे घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितले. नंतर काल गुरुवारी त्यांनी मायणा कुडतरी पाेलिस ठाणे गाठले व आपली कैफियत मांडली.

Margao News
Heavy Rains In South Goa : दक्षिणेत पावसाचा जोरदार खेळ!

...आणि पोलिसांनी मुसक्या आवळल्या

तपासात पोलिसांना हा ट्रक चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तपासकामाला सुरवात करून सुनिल याच्या मुसक्या आवळल्या, तर बिकास पैहलवान, मोहन रेबाडी व विकी हे फरार आहेत. या तिघांनी सुनिल याच्याकडून २५ लाख घेतले होते. ते परत केले नव्हते. ट्रक चोरल्यानंतर तो ट्रक व स्वतःची कार त्यांनी सुनिलला दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com