Margao: गोव्यात मडगावातील न्यू मार्केट बनले पहिले 'डिजिटल मार्केट'!

Margao: गोवा मुक्तिदिनाचे औचित्य साधून काल मडगाव येथे 'लागीं कोण' ॲप सुरु करण्यात आले.
Margao
MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

Margao: गोवा मुक्तिदिनाचे औचित्य साधून काल मडगाव येथे ‘लागीं कोण’ ॲप सुरू करण्यात आले. या ॲपद्वारे स्थानिक व्यापाऱ्यांची डिजिटल डिरेक्टरी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मार्केटमधील व्यापाऱ्यांचा ग्राहकांशी डिजिटल संपर्क येणार आहे. या ॲपमुळे मडगाव येथील न्यू मार्केट गोव्यातील पहिले डिजिटल मार्केट बनले आहे.

मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आज आजी-माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत या ॲप व वेबसाईटचे अनावरण केले. गोव्यातील ग्रामीण भागातील विक्रेत्यांना डिजिटल माध्यमातून एकत्र आणून त्यांच्याकडे मिळणाऱ्या मालाची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे ॲप डिझाईन केले असल्याची माहिती ॲपचे प्रवर्तक नीरज नाईक यांनी दिली. गोव्याच्‍या ग्रामीण भागातील सर्व विक्रेत्यांना या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Margao
Nilesh Cabral : ...तर गोव्यासाठी पर्यटनाची नवी कवाडे खुली होतील

मडगावचे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सदर ॲप आजच्या काळाची गरज होती अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. तर, न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर व गांधी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांनी या ॲपचे कौतुक करताना, या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू अशी आशा व्यक्त केली.

‘जेनोरा इन्फोटेक’ने हे ॲप विकसित केले असून त्यात स्थानिक व्यापाऱ्यांची आणि त्यांच्याकडे असलेल्या मालाची माहिती उपलब्ध असणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना आपल्याला हवा तो माल कुणाकडे मिळणार याची माहिती उपलब्ध होणार आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद प्रभू यांनी या माध्यमातून हे व्यापारी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील याचेच जास्त समाधान असल्याचे सांगितले.

नीरज नाईक, ॲपचे प्रवर्तक-

गोव्याच्‍या ग्रामीण भागातील विक्रेत्यांना डिजिटल माध्यमातून एकत्र आणून त्यांच्याकडे मिळणाऱ्या मालाची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे ॲप डिझाईन करण्‍यात आले आहे. गोव्याच्‍या ग्रामीण भागातील सर्व विक्रेत्यांना या ॲपच्‍या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com