Margao News: मडगाव पालिकेसमोर कचरा समस्या; सोनसडो फुल्ल

बसस्‍थानकाजवळ कचरा टाकण्‍यास मज्‍जाव
Margao Municipal Council
Margao Municipal CouncilGomantak Digital Team
Published on
Updated on

Margao Garbage Issue: यंदाची गणेश चतुर्थी मडगाव पालिकेसाठी विघ्‍न घेऊन येऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. कारण कचऱ्याच्या बिकट अडचणी पालिकेसमोर उभ्‍या राहिल्‍या आहेत.

सोनसडोतील जागा भरल्‍याने अतिरिक्‍त कचरा कदंब बस स्‍थानकाच्‍या जागेत टाकण्‍यात येत होता. मात्र उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार या जागेत आता कचरा टाकण्‍यास बंदी आणली आहे. त्‍यामुळे पालिकेसमोरील अडचणी अधिकच वाढल्‍या आहेत.

सोनसड्यावरील नागरिकांनी दाखल केलेल्‍या जनहित याचिकेवर उच्‍च न्‍यायालयात बुधवारी झालेल्‍या सुनावणीवेळी नॉर्मा अल्‍वारिस यांनी फातोर्डातील कदंब बसस्‍थानकाजवळची जमीन हरित कचरा आणि बागांमधील इतर कचरा टाकण्‍यासाठी वापरली जात आहे, अशी माहिती न्‍यायालयाला दिली आणि त्‍याची छायाचित्रेही सादर केली.

Margao Municipal Council
Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीसाठी कोकणात येताना टोलमाफीचा स्टिकर कसा मिळवाल? जाणून घ्या प्रक्रिया

पालिकेच्‍या वकिलांनी न्‍यायालयाला आश्‍वासन दिले की, त्‍या जमिनीवर कोणत्‍याही प्रकारचे डंपिंग करण्‍यास परवानगी दिली जाणार नाही.

या बाबी लक्षात घेऊन मुख्‍याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी नगरपालिका अभियंता श्रेणी-१, अभियंता श्रेणी-२, कनिष्‍ठ अभियंता तसेच रोड गँगच्‍या पर्यवेक्षकांना एका नोटिशीद्वारे वरील जमिनीत कोणतेही साहित्‍य टाकू नये, असे निर्देश दिले आहेत.

या सूचनेचे उल्‍लंघन झाल्‍याचे निदर्शनास आल्‍यास ते उच्‍च न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले जाईल आणि उल्‍लंघन करणाऱ्यांवर आवश्‍‍यक कारवाई केली जाईल, असे मुख्‍याधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Margao Municipal Council
Sateri Devi Temple Theft: अजब चोरांची गजब कहाणी! सर्वणमधील मंदिरात मौल्यवान वस्तूंसोबतच सीसीटीव्हीही चोरला

दुर्गंधीमुळे मनाई!

मडगाव पालिका प्रभागवार साफसफाई करण्‍यात आल्‍यानंतर गोळा होणारा कचरा ट्रकमध्‍ये भरून कदंब बसस्‍थानकानजीकच्‍या जागेत टाकण्यात येत होता.

मात्र या जागेत कचरा टाकला जात असल्‍याने येथे दुर्गंधी पसरत असल्‍याकडे लक्ष वेधण्‍याबरोबर रोगराई पसरण्‍याची भीती एका व्‍यक्‍तीने छायाचित्रासह पत्राद्वारे व्‍यक्‍त केल्‍याने बुधवारी त्‍याची दखल उच्‍च न्‍यायालयाने घेत या जागेत कचरा टाकण्‍यास मज्‍जाव केलेला आहे.

यामुळे ऐन चतुर्थीच्‍या काळात पालिका मंडळाला अडचणीचा सामना करावा लागत असल्‍याचे दिसू्न येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com