मडगाव: मडगाव पालिकेत नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. पालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या जुन्या मात्र सुस्थितीत असलेल्या अनेक गाड्या वापराविनाच गॅरेजमध्ये पडून आहेत. इतकेच नव्हे तर नव्यानेच महसूल वसुलीसाठी खरेदी केलेली एक गाडीही गेल्या महिन्याभरापासून गॅरेजमध्ये धूळ खात पडल्याचे समोर आले आहे.
गॅरेजमध्ये जवळपास दहा सुस्थितीतील गाड्या वापराविनाच असल्याचे एका वृत्तसंस्थेने समोर आणले आहे. मडगाव पालिकेच्या मालकीचे सात कॉम्पॅक्टर्स आहेत, ज्यापैकी पाच सध्या रस्त्यांवर कार्यरत आहेत. मात्र दोन कॉम्पॅक्टर गॅरेजमध्ये धूळ खात पडलेले असून, एक गायब असल्याची परिस्थिती मडगावात दिसू लागली आहे.
यासोबतच पालिकेच्या मालकीच्या नऊ रिक्षांपैकी सहा रिक्षा सध्या गॅरेजमध्ये उभ्या आहेत, ज्यातील बहुतांश सुस्थितीत असून, वापरायोग्य आहेत. तसेच टाटा-709 च्या आठ गाड्या पालिकेच्या ताफ्यात आहेत. मात्र यातील दोन गाड्या गॅरेजमध्ये पडून आहेत.
पालिकेच्या लाखो रुपयांच्या गाड्या गॅरेजमध्ये उभ्या असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासोबतच दोन टँकर, एक रुग्णवाहिकाही सध्या गॅरेजमध्ये वापराविना पडल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षभरापासून पालिकेच्या गाड्यांच्या देखरेखीसाठी असलेले सेंटरही बंद असल्याने गाड्यांची धुलाईही नीट होत नसल्याचे दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.