
Hydraulic parking project at margao
सासष्टी: मडगाव नगरपालिकेच्या मागे असलेल्या जागेत पार्किंगसाठी जवळजवळ एक हजार चौरस मीटर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकल्प व्हावा म्हणून पालिका प्रयत्नशील आहे. मात्र आता पालिकेने आरसीसीऐवजी हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आज सांगितले.
उद्या २० डिसेंबर रोजी नगरपालिका कौन्सिलची बैठक होणार. या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर सल्लागाराला प्रकल्पासाठी परवानगी दिली जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. हायड्रॉलिक पार्किंग सल्लागाराने यासंदर्भात आम्हाला सादरीकरण दाखविले आहे. या प्रकल्पामुळे केवळ ४०० चौरस मीटर जागेचा वापर होईल व जवळजवळ ६५० चौरस मीटर जागेची बचत होईल, जिचा वापर इतर कामांसाठी करता येईल, असे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले.
हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्प पाया रचण्यास थोडा वेळ लागेल. पण एकदा का पाया रचला की हा प्रकल्प लवकरच उभारणे शक्य होईल. पुढील सहा महिन्यांत तो मार्गी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.