मडगाव नगरपरिषदेच्या इमारतीला 117 वर्षे पूर्ण

ऐतिहासिक महत्त्व असलेला हा दिवस साजरा करण्यात परिषद अपयशी ठरली असल्याने, रहिवाशांनी संताप व्यक्त केला.
margao Municipal Council building completed 117 years
margao Municipal Council building completed 117 yearsDainik Gomantak

मडगाव : मडगाव नगरपरिषदेच्या इमारतीला शनिवारी 117 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने इमारतीकडे प्राधान्याने लक्ष देणे अपेक्षित होते, मात्र कौन्सिलकडून याकडे दुर्लक्ष झाले आहे. आणि यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

संपूर्ण इमारतीला रंग देण्याचा सद्यपरिषदेचा ठरावही अयशस्वी ठरला होता. ऐतिहासिक महत्त्व असलेला हा दिवस साजरा करण्यातही परिषद अपयशी ठरली आहे.

(margao Municipal Council building completed 117 years)

margao Municipal Council building completed 117 years
'या' पात्र कुटुंबांनाच मिळणार 3 मोफत सिलेंडर; मंत्री गोविंद गावडे यांची माहिती

लिखित दस्तऐवजांमध्ये असे नमूद केले आहे की नगरपालिका इमारतीची पायाभरणी 27 सप्टेंबर 1902 रोजी करण्यात आली होती आणि ही भव्य नवीन नगरपालिका इमारत ऑर्लिमच्या केटानो कॅमिलो द सिल्वा यांनी बांधली आणि 30 एप्रिल 1905 रोजी वास्तूचे उद्घाटन करण्यात आले होते.

"मडगाव नगरपरिषदेला 117 वर्षे पूर्ण झाले आहे. पण खेदाची गोष्ट म्हणजे, राज्याच्या व्यावसायिक राजधानीत या इमारतीला रंग देण्याला देखील कौन्सिल प्राधान्य देत नाही" असे, माजी अध्यक्ष सॅव्हियो कुतिन्हो यांनी सांगितले. .

"नवीन परिषदेने अगदी वर्षभरापूर्वी, गेल्या दिवाळीपूर्वी इमारतीला रंग देण्याचे आश्वासन दिले होते, अता पुढची दिवाळी लवकरच येईल. मडगावचे लोक या परिषदेकडून काही चांगल्याची आशा करत आहेत" असे, कुतिन्हो म्हणाले.

margao Municipal Council building completed 117 years
हाय गर्मी...! गोव्यात पारा चढला, एप्रिलमध्ये 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना मडगावमधील रहिवाशांनी ऐतिहासिक वास्तूची देखभाल व जतन न केल्याबद्दल परिषदेविरुद्ध संताप व्यक्त केला.

“परिषदेने हा दिवस मडगावच्या लोकांसोबत साजरा करणे अपेक्षित होते. तथापि, मला शंका आहे की कोणत्याही परिषदेच्या सदस्याला महानगरपालिका इमारतीला 117 वर्षे पूर्ण होत आहेत या शुभ प्रसंगाची जाणीव आहे" असे, विनोद शिरोडकर म्हणाले.

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच, MMC चेअरपर्सन, परेरा यांनी सांगितले होते की रंगाच्या निधीने महापालिकेच्या वास्तुचे सुशोभिकरण करणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असेल, परंतु जवळपास 12 महिने उलटले तरी अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com