Margao: राज्‍याच्‍या आर्थिक राजधानीतही बालकांच्‍या नशिबी मोलमजुरीच!

Goa Financial Capital Margao: राज्‍याची आर्थिक राजधानी म्‍हणून ज्‍या मडगावकडे पाहिले जाते तिथेही अल्‍पवयीन मुलांच्‍या नशिबातील मजुरी काही केल्‍या जात नाही.
Margao monir student sell rainy material to live life took education along with
Margao monir student sell rainy material to live life took education along withDainik Gomantak

Goa Financial Capital Margao: राज्‍याची आर्थिक राजधानी म्‍हणून ज्‍या मडगावकडे पाहिले जाते तिथेही अल्‍पवयीन मुलांच्‍या नशिबातील मजुरी काही केल्‍या जात नाही. सध्‍या पाऊस तोंडावर आलेला असताना या अल्‍पवयीन मुलांना पावसाळी साहित्‍य विकण्‍याच्‍या कामाला जुंपले गेेले आहे. अन्‍य मुले शाळेत शिक्षण घेण्‍यासाठी जात असताना या काही कमनशिबी मुलांना मात्र त्‍या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी रेनकोट विकण्‍यासाठी स्‍वत: पावसात भिजून चिंब व्‍हावे लागत आहे.

मडगाव पालिका उद्यानाच्‍या परिसरात तुम्‍ही भेट दिल्‍यास तुम्‍हाला हे चित्र सहज दिसेल. त्‍याशिवाय कोलवा सर्कलच्‍या सिग्‍नल्‍सजवळही अशी लहान मुले पावसाळी साहित्‍य तसेच गाडीचे साहित्य विकण्‍यासाठी फिरत असल्‍याचे चित्र दिसत असून या मुलांना त्‍यातून बाहेर काढण्‍यासाठी कुणीच पुढे येत नाही हे त्‍यांचे दुर्दैव आहे.

Margao monir student sell rainy material to live life took education along with
Margao Railway : मडगाव रेल्‍वेस्‍थानकावर ‘रेंट अ बाईक’ सेवा नकोच; मुख्‍यमंत्र्यांची महामंडळाला सूचना

दक्षिण गोव्‍याच्‍या ‘वन स्‍टॉप साहाय्‍यता’ केंद्राच्‍या प्रमुख आवदा व्‍हिएगस यांच्‍या केंद्रातही बालमजुरीची काही प्रकरणे हाताळण्‍यासाठी आली होती. सध्‍या ही प्रकरणे कमी आहेत. मात्र, पूर्वी अशी प्रकरणे बरीच येत होती. अशा प्रकरणात आम्‍ही ही मुले ज्‍या राज्‍यातील आहेत त्‍या राज्‍यातील समित्‍यांशी संपर्क साधून त्‍यांचे योग्‍य ते पुनर्वसन करण्‍याचा कार्यक्रम राबवितो, असे व्‍हिएगस यांनी सांगितले.

यापूर्वी जिल्‍हा बाल कल्‍याण समितीने मडगाव कोकण रेल्‍वे स्‍थानक परिसरात बेवारसपणे वावरणाऱ्या काही परप्रांतीय मुलांची सुटका केली होती. ही मुले ज्‍या राज्‍यातील आहेत तेथील बाल कल्‍याण समितीशी संपर्क साधून आम्‍ही या मुलांचे त्‍यांच्‍या गावातच पुनर्वसन करण्‍याचा प्रयत्‍न करतो, असे दक्षिण गोवा बाल कल्‍याण समितीच्‍या अध्‍यक्ष अमृता कामत यांनी सांगितले.

Margao monir student sell rainy material to live life took education along with
Margao News : मडगावात कामतांच्या वर्चस्वाला धक्का; भरवशाच्या भागाने दिला दगा

घरकामासाठी वापर अधिक

दक्षिण गोव्‍याच्‍या ‘वन स्‍टॉप साहाय्‍यता’ केंद्राच्‍या प्रमुख आवदा व्‍हिएगस यांना विचारले असता, गोव्‍यात बालमजुरीची किती प्रकरणे नोंद होतात, हा जरी वादाचा विषय असला तरी गोव्‍यात लहान मुलांकडून मजुरीची कामे अजून करून घेतली जात असून मडगावात रस्‍त्‍यावर साहित्य विकणारी मुले तेच दाखवू्न देतात. त्‍याशिवाय घरकामासाठी लहान मुलांचा वापर अजूनही सुरू असून याकडे ज्‍या गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे तसे अजूनही दिले जात नाही, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

बाल मजुरी विरोधी दिन विशेष

‘बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा..’ असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो; पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर पाणी विकणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते. कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत चालले आहे. १२ जून हा दिवस बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो, त्याविषयी माहिती.

Margao monir student sell rainy material to live life took education along with
Margao News : ‘कुशल पर्यटक मार्गदर्शक’ योजना राबवू : पर्यटनमंत्री रोहन खंवटे

साहित्य विक्रीसाठी वापर

दक्षिण गोवा बाल कल्‍याण समितीच्‍या अध्‍यक्ष अमृता कामत यांच्‍याशी संपर्क साधला असता, गोव्‍यात तुरळक प्रमाणात का असेना; पण बालमजुरी चालते, ही गोष्‍ट खरी आहे. मात्र, ही मुले बहुतांश परप्रांतीय असून त्‍यांचे पालकही भटके असल्‍याने या मुलांचा ते जत्रांच्‍यावेळी फुगे विकणे किंवा अन्‍य कामांसाठी वापर करून घेतात, असे त्‍यांनी सांगितले.

गोव्यात अलीकडच्या काळात बालमजुरीबाबत कामगार आयोगाकडे एकही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिस, स्वयंसेवी संस्था, बाल व महिला कल्याण विभाग आणि कामगार आयोग यांच्या संयुक्त कामामुळे गोव्या​तील बालकामगार प्रकरणे शोधण्यात मदत होईल, असा दावा कामगार आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

१२ जून हा दिवस ‘जागतिक बालमजुरी विरोधी दिवस’ म्हणून पाळला जातो. काही वर्षांपूर्वी अशी अनेक उदाहरणे होती, ज्यात १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना काही दलालांकडून धोकादायक कामांमध्ये गुंतवले जात होते, जे कायद्याने दंडनीय आहे; परंतु कालांतराने बालकामगार प्रकरणांची संख्या घटली आहे. यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात, ती म्हणजे कडक कायदा, व्यापक शिक्षण, बालमजुरीबाबत जनजागृती इत्यादी. गोव्यात बालमजुरीचे एकही प्रकरण कामगार आयोगाकडे सध्या नोंद नाही.

Margao monir student sell rainy material to live life took education along with
Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

‘गोमन्तक’शी बोलताना गोव्याच्या कामगार आयोगाचे उपायुक्त मिलिंद गोवेकर यांनी सांगितले की, बालमजुरीचे गुन्हे आयोगाद्वारे बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा १९८६ या कायद्यांतर्गत नोंदवले जातात. पण त्यापलीकडे आयोगाला पुनर्वसन करता येत नाही किंवा अल्पवयीन मुलाला सोबत नेता येत नाही. अशा प्रकरणांमध्ये पुनर्वसनासाठी आपल्याला काही नियम आणि प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक असते. १४ वर्षांखालील मुले ज्यांना काम दिले जाते त्यांना नंतर एनजीओ आणि इतर संबंधित प्राधिकरणांच्या उपस्थितीत बाल संरक्षण गृहात पाठवले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com