Margao News : ‘आपत्कालीन’ व्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज; दक्षिण गोवा प्रशासन सतर्क

Margao News : जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक वीज, पाणी पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घ्‍यावी आणि साथीचे रोग न पसरण्‍यासाठी आवश्‍‍यक उपाययोजना कराव्‍यात, असे निर्देश दिलेले आहेत.
goa
goaDainik Gomantak

Margao News :

मडगाव, दक्षिण गोव्‍यातील सर्व सरकारी विभागांना मान्‍सूनमधील कोणत्‍याही आपत्कालीन परिस्‍थितीला सामोरे जाण्‍यासाठी आवश्‍‍यक तयारी करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. धोकादायक इमारती, होर्डिंग्‍ज यांच्‍या तपासणीनंतर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत.

वीज, पाणी पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घ्‍यावी आणि साथीचे रोग न पसरण्‍यासाठी आवश्‍‍यक उपाययोजना कराव्‍यात, असे निर्देश दिलेले आहेत.

मान्‍सूनच्‍या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी आणि जिल्ह्याचे आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन समिती अध्‍यक्ष आश्विन चंद्रू यांच्‍या उपस्‍थितीत झालेल्‍या या बैठकीला मान्‍सूनच्‍या पूर्वतयारीचा आढावा घेण्‍यात आला. यावेळी बांधकाम विभाग, जलस्रोत विभाग, रेल्‍वे, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस अशा ५७ विभागांचे प्रतिनिधी उपस्‍थित होते.

goa
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

पावसाळ्‍यात नाले भरून राहू नयेत यासाठी त्‍यांची सफाई करणे, रस्त्याकडेच्या झुडपांची छाटणी करणे, भूस्खलन प्रवण आणि पूर प्रवण क्षेत्रांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना राबविणे, पूरपरिस्थितीत वाहतूक वळवणे व लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याची तयारी ठेवणे, वेस्टर्न बायपासच्या बांधकामामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक व्यवस्था करणे, अशा सूचना करण्यात आल्या.

गटार तसेच तलाव व इतर जलस्रोत स्वच्छ करावेत आणि त्यांचे निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील खोदकाम ३१ मेपर्यंत पूर्णपणे बुजविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

समुद्रात, धबधब्यांवर पोहण्यास बंदी

धबधबे, समुद्रात पोहण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक, कुळे यांनी आरपीएफ व वन विभाग यांच्या समन्वयाने कुळे आणि सोनावली रेल्वे स्थानकांवर सतत लक्ष ठेवावे व दूधसागर धबधब्यावर पावसाळ्यात कुणालाही जाऊ देऊ नये.

पावसाळा संपेपर्यंत पर्यटकांना समुद्रात आणि धबधब्यांच्या भागात न जाण्याचा सल्ला पर्यटन विभागाने जारी केला असून संबंधित ठिकाणी ‘नो स्वीमिंग’ असे फलक लावावेत, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत

आरोग्य विभागाने सर्व रुग्णवाहिका दुरुस्त कराव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध कराव्यात. स्थानिक स्वराज संस्थांनी कचरा साठू नये याची काळजी घ्यावी. दक्षिण गोव्यातील सातही निवारा केंद्रे तयार ठेवावीत. सर्व विभागांद्वारे नियंत्रण कक्ष स्थापन केले जातील, जे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह २४ तास कार्यरत असतील, असेही यावेळी सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com