Sasashti News : आराखड्याला मान्यतेची प्रतीक्षा; मडगाव मास्टर प्लॅनचा चेंडू ‘जीसुडा’ने टोलविला पालिकेच्या कोर्टात

Sasashti News : जीसुडाच्या म्हणण्यानुसार फोंडा, वाळपईचा मास्टर प्लॅन तयार झाला असून तेथील नगरपालिकांनी त्याला मान्यता दिली आहे.
Margao Corporation
Margao Corporation Dainik Gomantak

Sasashti News :

सासष्टी, मडगावचा मास्टर प्लॅन अनेक वादांमध्ये गुरफटलेला आहे. शुक्रवारी शॅडो कौन्सिलने हा प्लॅन म्हणजे महाघोटाळा असल्याचा दावा केला होता. मडगावचा मास्टर प्लॅन अद्याप पूर्ण झालेला नाही, असा शॅडो कौन्सिलचा दावा आहे.

मात्र, गोवा राज्य नगरविकास विभागाकडून (जीसुडा) सांगण्यात आले की, मडगावचा मास्टर प्लॅन नगरपालिकेकडे मान्यतेसाठी पाठविलेला आहे.

या मास्टर प्लॅनला नगरपालिका मंडळाने चर्चा करून एक तर मान्यता द्यावी किंवा प्लॅन नाकारावा, असा प्रस्ताव ठेवला आहे. ‘जीसुडा’च्या म्हणण्यानुसार, गोवा राज्य नगरविकास विभागाने हल्लीच नगरपालिकेला यासंदर्भात पत्र लिहून मास्टर प्लॅनबद्दल चर्चा करावी आणि सर्व संबंधितांना विश्र्वासात घेऊन तो मान्य करावा. तसेच मास्टर प्लॅनचा प्रस्ताव सरकारला सादर करावा, असे स्पष्ट केले आहे.

जीसुडाच्या म्हणण्यानुसार फोंडा, वाळपईचा मास्टर प्लॅन तयार झाला असून तेथील नगरपालिकांनी त्याला मान्यता दिली आहे.

विद्यमान मंडळातील नगरसेवकही उदासीन

ज्या खासगी कंपनीवर हा प्लॅन तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे, त्यांनी त्यानुसार आराखडा तयार करून त्यात अनेक सूचनाही केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसुद्धा झाले होते.

मात्र, ते अगदी गुप्तपणे करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शहरातील नगरसेवकांसाठी सुद्धा त्याचे सादरीकरण झाले. मात्र, त्यालासुद्धा अल्प प्रतिसाद मिळाला. सर्व नगरसेवक त्यावेळी उपस्थित नव्हते, असे सांगण्यात आले.

Margao Corporation
Goa's Pankaj Narvekar Climbs Mount Everest: ऐतिहासिक! माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पंकज ठरला पहिला गोमन्तकीय

व्यावसायिक शोषणासाठी प्लॅन

मडगावचा मास्टर प्लॅन नेमका कसा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काहीजणांच्या मते, मडगाव शहराचे व्यावसायिक शोषण करण्यासाठी हा प्लॅन केला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ‘जीसुडा’च्या मताप्रमाणे तो प्लॅन मान्य करणे किंवा नाही, हे सर्वस्वी मडगाव नगरपालिका मंडळाच्या हातात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com