Margao Municipal Library: मडगावातील ८९ वर्ष जुन्या वाचनालयाचं नूतनीकरण गरजेचं; आधुनिक सुविधांसाठी आमदार कामत प्रयत्नशील

Margao Library Renovation: जवळपास ८९वर्ष पूर्ण झालेल्या मडगाव येथील नगर वाचनालयाच्या जुन्या इमारतीला नव्याने उभं करण्याची गरज, आमदार दिगंबर कामत यांना नवीन उभ्या राहणाऱ्या वाचनालयात आधुनिक सुविधा जोडायच्या आहेत.
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

Margao News: मडगावात वाचनालयाच्या नूतनीकरणाची आता लवकरच सुरुवात होणार आहे. ४ डिसेंबर १९१४ मध्ये सुरु झालेल्या, जवळपास ८९वर्ष पूर्ण झालेल्या मडगाव येथील नगर वाचनालयाच्या जुन्या इमारतीला नव्याने उभं करण्याची गरज आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना माहिती आणि तंत्रज्ञान विभाग तसेच कला आणि संस्कृती विभागाकडून इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी उचलण्याची अपेक्षा आहे.

आमदार दिगंबर कामत यांना नवीन उभ्या राहणाऱ्या वाचनालयात आधुनिक सुविधा जोडायच्या आहेत, जेणेकरून स्थानिक वाचकांना आणि विद्यार्थ्यांना यामुळे अधिकाधिक फायदा मिळेल. या वाचनालयाच्या नवनिर्माणाचा एकूण खर्च २३ लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना नवीन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा पुरवायच्या आहेत. नवीन वाचनालयात मुलांसाठी एक वेगळा विभाग असावा जिथे डिजिटलाईझ पुस्तकं, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग यांसारखे पर्याय उपलब्ध असतील अशी इच्छा त्यांनी अलीकडेच एका आयटी अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये व्यक्त केली.

मडगावमधल्या या वाचनालयाचा कला आणि संस्कृती विभागामध्ये सहभाग नसला तरीही आमदार कामत यांनी विभागाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. मडगाव स्थित या वाचनालयात अनेक ऐतिहासिक पुस्तके आणि निर्देशिकांचा समावेश आहे.

Digambar Kamat
Mandovi Bridge Accident: मांडवी पुलावर भीषण अपघात; दुचाकीचालक गंभीर जखमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com