
Margao Bus Stand: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त आजपासून 7 फेब्रुवारीपर्यंत मडगाव कदंब बसस्थानक बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बससेवा नेहरु स्टेडियमजवळील कृत्रिम फुटबॉल मैदान व इनडोअर स्टेडियच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेतून सुरू केली जाईल.
प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी तात्पुरते आच्छादन घालून शेड तयार करण्यात आली आहे. वास्को, पणजी, फोंडा, काणकोण, सावर्डे, कोलवा, बाणावली, केळशी तसेच सिटी बससेवा या बसस्थानकातून सुरू असेल.
शटल बस तिकीट विक्रीसाठी खास काऊंटर उघडण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कुठली बस कुठे जाईल हे कळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फलक लावण्यात मडगाव कदंब बसस्थानक 7 फेब्रुवारीपर्यंत बंद; वाहतुकीचे स्थलांतर आले आहेत.
तसेच फिरत्या शौचालयांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत तरी नित्यमार्गाने बससेवा सुरू आहे, असे कदंब महामंडळ मडगाव डेपोचे व्यवस्थापक संकेत मांद्रेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
पार्किंगचा प्रश्न सतावणार
बससेवा तात्पुरती स्थलांतरित केली असली तरी प्रवासी आपली वाहने कदंब बसस्थानकावर व परिसरात ठेवत त्यांच्यापुढे वाहतुकीचा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. बससेवेचा खोळंबा होणार नसला तरी पार्किंगचा खोळंबा निश्र्चितच होईल.
रवींद्र भवनासमोरील श्रीराम रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पार्किंगची व्यवस्था कुठे करण्यात आली आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षेवर चर्चा
आज बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कचेरीत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू (आयएएस) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली.
यावेळी दक्षिण गोवा पोलिस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, वीज खाते, मडगाव नगरपालिका, जिल्हाधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सुरक्षाव्यवस्थेवर चर्चा झाली.
पंतप्रधान हेलिकॉप्टरने येण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ फेब्रुवारी रोजी मडगावातील सभेला तसेच ‘विकसित भारत’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी हेलिकॉप्टरने येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचे हेलिकॉप्टर फातोर्ड्याच्या ‘साग’ मैदानावर उतरेल. त्यानंतर तेथून मोदी रस्त्याने कदंब बसस्थानकावरील सभेच्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.