

मडगाव: सोन्याच्या चेनची रक्कम एनएफटीद्वारे दिल्याचे भासवून मडगावातील एका सराफाला साडेतीन लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याच्या मुसक्या मडगाव पोलिसांनी महाराष्ट्रातील पुणे येथे आवळल्या. आदित्य विनोद गायकवाड (वय २२) असे संशयिताचे नाव असून काल मडगावात आणल्यानंतर त्याला रीतसर अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेली चेन जप्त केली असून अधिक तपासासाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली.
मडगावच्या न्यू मार्केटमधील श्री साई ज्वेलर्समध्ये ३० जून रोजी वरील घटना घडली होती. या प्रकरणी मागाहून प्रीतम बांदोडकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आदित्य हा दुकानात ग्राहक म्हणून आला होता. त्याने दुकानातून ३ लाख ५६ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी खरेदी केली होती. पैसे देण्याची वेळ आली, तेव्हा त्याने आपल्या मोबाईलवर बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाल्याचा बनावट स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवून सोन्याची साखळी घेऊन पसार झाला.
मात्र, काही वेळाने ज्वेलर्स मालकाने बँक खाते तपासले असता त्यात कोणतीही रक्कम जमा झाली नसल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदवली. मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.