Bicholim Fish Market : ‘सुक्‍या’ मासेविक्रेत्‍यांचे अतिक्रमण; स्‍थानिकांना फटका

Bicholim Fish Market : डिचोली बाजारात नियमित सुकी मासळी उपलब्ध होत नसली, तरी बुधवारी साप्ताहिक बाजाराच्या दिवशी खास सुक्या मासळीचा बाजार भरत असतो.
Bicholim Fish Market
Bicholim Fish MarketDainik Gomantak

Bicholim Fish Market :

डिचोली, पावसाळा जवळ आल्याने सध्या बाजारात बेगमीसाठी लागणाऱ्या वस्‍तूंना मोठी मागणी आहे. विशेषत: सुकी मासळी खूप ‘भाव’ खात आहे. मात्र परप्रांतीय विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे डिचोलीतील स्थानिक व पारंपरिक विक्रेत्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

परप्रांतीयांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक विक्रेते पुरते अडचणीत आले आहेत. आमच्या व्यवसायावर गदा आली आहे, अशी व्यथा डिचोली बाजारातील पारंपरिक महिला विक्रेत्यांनी मांडली. गेल्या काही वर्षांपासून डिचोली बाजारात परप्रांतीय विक्रेत्यांची संख्‍या वाढली आहे. हे विक्रेते मिळेल त्या ठिकाणी जागा अडवून व्यवसाय करतात.

Bicholim Fish Market
Goa Fontainhas: पणजीतील फोन्तेन्हासची जगाला मोहिनी, अमेरिकेतील ‘आर्किटेक्चरल डायजेस्ट’चे सर्वेक्षण

त्यामुळे आमच्या पारंपरिक व्यवसायाला फटका बसत आहे, अशी खंत स्थानिक विक्रेत्या व्‍यक्त करत आहेत.

डिचोली बाजारात नियमित सुकी मासळी उपलब्ध होत नसली, तरी बुधवारी साप्ताहिक बाजाराच्या दिवशी खास सुक्या मासळीचा बाजार भरत असतो. जुन्या बाजारातून नवीन बाजार संकुलाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर हा बाजार थाटला जातो. मात्र या बाजारात आता सुकी मासळी खरेदीसाठी पूर्वीसारखी गर्दी दिसून येत नाही. साप्ताहिक बाजाराच्या दिवशी बाजारात विविध ठिकाणी सुकी मासळी मिळत असल्याने ग्राहक मुद्दामहून बाजारात येण्याचे कष्ट घेत नाहीत.

काही वर्षांपूर्वी पावसाळा जवळ आला की सुक्या मासळीच्या पुरुमेंतासाठी बाजारात गर्दी होत असे. मात्र आता ग्राहकांची संख्या कमी झाली आहे, असे पारंपरिक विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Bicholim Fish Market
Sanquelim Goa: साखळी रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती; पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी

सुकी मासळी घेऊन बसतात भाजी मार्केटात

साप्ताहिक बाजाराच्या दिवशी परप्रांतीय विक्रेत्यांपैकी बहुतांश जण सुक्या मासळीच्या बाजारात बसण्याचे टाळून भाजी मार्केट आदी मोक्याच्या ठिकाणी बसतात. त्यामुळे बऱ्याच ग्राहकांनी सुक्या मासळीच्या बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

बाजारात विविध ठिकाणी बसणाऱ्या विक्रेत्यांना पालिकेने रोखून सुक्या मासळीच्या बाजारात बसण्याची ताकीद द्यावी, अशी मागणी पारंपरिक विक्रेत्या महिलांनी केली आहे. बाहेर बसणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांना सुक्या मासळीच्या बाजारात आणल्यास साहजिकच बाजारात ग्राहकांची गर्दी वाढून सर्व विक्रेत्यांना त्याचा फायदा होईल, असेही त्‍यांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com