Margao News : भाजप वादळापुढे काँग्रेसचा प्रचार फिका; धेंपेंच्या अखेरच्या प्रचार सभेत 'रेकॉर्ड ब्रेक' गर्दी

Margao News : लोक आमच्याच बरोबर आहेत, असा दावा काँग्रेस छातीठोकपणे करत असली तरी आपला उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसने केलेले प्रयत्न फारच तोकडे पडल्याचे दिसून आले आहे.
Margao
Margao Dainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

Margao News :

मडगाव, यावेळी दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपे यांना विजयी करून दक्षिण गोव्यातून पहिल्यांदाच महिला खासदार दिल्लीत पाठविण्याचा चंग बांधलेल्या भाजपने प्रचारसभा आणि कोपरा बैठका घेण्याचा सपाटा लावल्याने त्यापुढे काँग्रेसचा प्रचार अगदी फिका पडल्यागत वाटत आहे.

लोक आमच्याच बरोबर आहेत, असा दावा काँग्रेस छातीठोकपणे करत असली तरी आपला उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसने केलेले प्रयत्न फारच तोकडे पडल्याचे दिसून आले आहे.

जाहीर प्रचारासाठी एक दिवस बाकी असताना भाजपने कुंकळ्ळी येथे ‘न भूतो..’ अशा गर्दीत प्रचारसभा घडवून आणून आपल्या नेटक्या संयोजन कौशल्याचे प्रदर्शन केलेच त्याशिवाय ते एक प्रकारे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केलेले त्यांचे शक्तीप्रदर्शनही होते. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही कुंकळ्ळीत अशीच प्रचार सभा घडवून आणली होती, पण भाजपच्या सभेच्या उपस्थितीच्या तुलनेने ही गर्दी कमीच होती.

काल शनिवारी मडगाव आणि फातोर्डा येथे भाजपने दणक्यात ‘रोड शो’ घडवून आणून या दोन्ही मतदारसंघांतील आपली ताकद दाखवून दिली. फातोर्डा येथे विजय सरदेसाई यांनी काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनात अशीच सभा आयोजीत केली होती पण तिथेही गर्दी त्या मानाने कमीच होती.

भाजपने केपे, काणकोण, सांगे, सावर्डे या हिंदू बहुल भागात भाजपने कोपरा बैठका घेण्याबरोबर आपल्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना कामाला जुंपून लोकांच्या घर अन् घर भाजपचा जाहीरनामा पोहोचणार याची काळजी घेतलेली असताना काँग्रेस पक्षाने आपला प्रचार सासष्टी आणि मुरगाव तालुक्यांतील ख्रिस्ती बहुल भागात सभा घेऊन आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. सांगे, केपे, काणकोण, फोंडा या तालुक्यात फक्त बाजारात फेरी मारून आपणही या रेसमध्ये आहे, हेच दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे करण्यात आला.

त्यामानाने आरजी पक्षाचे रूबर्ट परेरा यांनी आपला प्रचार दोन महिने अगोदर सुरू करून दक्षिण गोव्यात सर्व स्तरातील लोकांमध्ये पोहोचण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला. विशेषतः कुडतरी, राय, फातोर्डा, सांगे आणि शिरोडा या भागात त्यांनी बऱ्यापैकी पाय पसरविले. ‘बसप’च्या डॉ. श्वेता गावकर यांनीही ठिकठिकाणी भेटी देऊन आपला जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

‘आप’चा भक्कम पाठिंबा

दक्षिण गोव्यात काँग्रेसचा प्रचार ढेपाळलेला दिसत असताना ‘आप’ने मात्र त्यांना चांगला पाठिंबा दिला. कॉंग्रेस आपला उमेदवार जाहीर करण्यास विलंब लावत असल्याचे दिसून आल्यावर ‘आप’ने स्वतः पुढाकार घेऊन दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी जागृती बैठका घेण्यास सुरुवात केली होती. बाणावलीचे आमदार वेंझी विएगस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.

गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी घणाघाती भाषणे करून काँग्रेस प्रचारात जान आणली.

Margao
Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

मोदींची ‘स्ट्रॅटजिक’ सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा प्रथमच मुरगाव तालुक्यात आयोजित करून भाजपने एका दगडात कित्येक पक्षी मारले.

या तालुक्यात गोव्यात स्थायिक झालेल्या परप्रांतीय मतदारांची संख्या भरपूर असून त्यात हिंदी पट्ट्यातील लोकांचा जास्त भरणा आहे. हा मतदार भाजपपासून दूर जाऊ नये, यासाठीच प्रामुख्याने ही सभा सांकवाळ येथे येथे आयोजित करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com