Margao CCTV Camera : मडगाव शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत नावालाच; दीड वर्षांपासून बंदच

Margao CCTV Camera : या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होत होता, हे कॅमेरे सुरू असताना महत्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठीही त्यांची पोलिसांना मदत होत असे, अशी माहिती मडगाव शहर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
 CCTV Camera
CCTV CameraDainik Gomantak
Published on
Updated on

Margao CCTV Camera :

फातोर्डा, मडगाव शहरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरूच केलेले नसून येथील सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही यंत्रणा पुन्हा कधी कार्यान्वित होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी, गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी या सीसीटीव्ही कॅमेरे शहरात कार्यन्वित असणे गरजेचे आहे. १० वर्षांपूर्वी जानेवारी २०१३ मध्ये मडगाव परिसरावर देखरेख ठेवणारे हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ते अकार्यान्वित असून रस्त्यांवरील चौकांत वाहतूक नियोजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगाराचा मागोवा घेण्यासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होत होता, हे कॅमेरे सुरू असताना महत्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठीही त्यांची पोलिसांना मदत होत असे, अशी माहिती मडगाव शहर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

 CCTV Camera
Goa Loksabha: संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य! काँग्रेसच्या विरियातोंची उमेदवारी बाद करण्याची भाजपची मागणी

या बरोबरच वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यांचा उपयोग होत असतो. मडगाव शहरात देखरेख ठेवण्यासाठी आके पांडव कपेल, लिली गारमेंट चौक, कारे कॉर्नर, बँक ऑफ बडोदा परिसर, स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील रस्त्यासहित इतर दोन ठिकाणी हे कॅमेरे कार्यन्वित होते. याचे नियंत्रण मडगाव वाहतूक कार्यालय या ठिकाणाहून करण्यात येत होते.

आता मागील दीड वर्षांपासून बंद असलेले हे कॅमेरे त्या ठिकाणाहून गायब झाले आहेत. ते यापुढे कधी कार्यन्वित होणार असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

कॅमेरे कुठे बसवावेत, अहवाल सादर !

मडगाव वाहतूक विभागाचे अधिकारी संजय दळवी यांनी सांगितले,की राज्यात एकंदरीत ७२ ठिकाणी अद्ययावत नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

यातील ६ ते ७ ठिकाणी मडगाव शहरात बसविण्यात येतील याविषयी मडगाव शहरात कुठे कॅमेरे बसवावेत, याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी दोन ते तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com