Margao Carnival
Margao CarnivalDainik Gomantak

मडगावचा कार्निव्‍हल ‘इंत्रुज’ परंपरेवर

आग्नेल फर्नांडिस; लोगो व गीताचे थाटात अनावरण, ‘बोंडो’ खास आकर्षण
Published on

सासष्टी : मडगावमधील यंदाचा कार्निव्‍हल महोत्‍सव इंत्रुज परंपरा व संकल्पनेवर आधारीत असणार आहे. या महोत्‍सवानिमित्त मडगावमधील 25 ही प्रभागांमध्ये खेळ तियात्रांचे आयोजन करण्यात येईल. त्यासाठी तीन पथके तयार करण्‍यात आलेली आहेत, अशी माहिती मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी व कार्निव्‍हल उत्‍सव समितीचे अध्यक्ष आग्नेल फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इंत्रुज परंपरा पुनरुज्जीवीत करण्याची ही चांगली संधी आम्हांला प्राप्त झाली आहे. या संधीचे सोने करण्‍याचा आमचा प्रयत्‍न असेल. आचारसंहितेमुळे सरकारने कार्निव्‍हल साजरा करण्याची जबाबदारी मुख्य अधिकाऱ्यांवर सोपवली आहे, असे फर्नांडिस म्‍हणाले. याप्रसंगी मडगावच्या कार्निव्‍हल लोगो व गाण्याचे अनावरण करण्यात आले. हे गाणे प्रसिद्ध कलाकार ज्यो डिकॉस्‍टा यांनी सादर केले असून ‘काय बरो दिस हो, खुशालकायेन नाचपाचो... खुशाल जावन मोग दाखोवपाचो’ असे या गीताचे सुरुवातीचे बोल आहेत.

Margao Carnival
विजयकुमार वेरेकरांना केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा पुरस्कार जाहीर

या पत्रकार परिषदेला मुख्य अभियंता तथा सचिव मनोज आर्सेकर व अभियंता तथा खजिनदार विशांत नाईक यांचीही उपस्‍थिती होती.

रविवारी चित्ररथ मिरवणूक

यंदा मडगावात (Margao) तीन दिवस कार्निव्‍हल महोत्‍सव साजरा केला जाणार आहे. शुक्रवार दि. 25 व शनिवार दि. 26 फेब्रुवारीचे कार्यक्रम मडगावात नगरपालिका इमारतीसमोर होणार आहेत. यात लोकोत्सव हा गोव्याची संस्कृती, परंपरेवर आधारीत कार्यक्रम होईल. त्‍यात मेळ, संगीत यांचाही समावेश असेल. शिवाय रविवार दि. 27 रोजी होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीची गोव्याची (goa) संस्कृती हीच संकल्पना असेल. असभ्य चित्ररथांना परवानगी दिली जाणार नाही, असे फर्नांडिस यांनी सांगितले.

Margao Carnival
मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची केंद्रीय क्रीडा मंत्रालयात नियुक्ती

सरकारकडून 20 लाख मंजूर

यंदाचे कार्निव्‍हल महोत्‍सवाचे (carnival-festival) खास आकर्षण असेल तालवाद्याचे प्रसिद्ध वादक बोंडो. ते आपली कला पेश करतील. शिवाय युवा व नवोदित वादकांसाठी खास प्रशिक्षणही देतील, अशी माहिती आग्नेल फर्नांडिस यानी दिली. हा कार्निव्‍हल महोत्‍सव गोव्याच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने आयोजित करण्‍यात आला आहे. गतसाली आम्हांला अनुदान थोडे उशिरा मिळाले हे खरे. मात्र 20 लाखांपैकी 5 लाख रुपये खर्च न करता परत सरकारी तिजोरीत जमा करण्यात आले. यंदाही सरकारने 20 लाख रुपये मंजूर केले असून बक्षिसांची रक्कम वेगळी असेल, असे फर्नांडिस म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com