Marathi Literary conference : पर्वरी येथे आज मराठी राजभाषा साहित्य संमेलन

Marathi Literary conference : संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून किमान तिनशे जण या संमेलनाला उपस्थित राहतील असे गृहीत धरून सारी व्यवस्था करण्यात आली आहे.
Marathi Literary conference
Marathi Literary conferenceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Marathi Literary conference :

पणजी, पर्वरी येथील आझाद भवनमध्ये उद्या (ता.२६) दिवसभर ‘असे आमुची मायबोली’ व ‘गोमंतक मराठी अकादमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा संमेलन होणार आहे.

संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून किमान तिनशे जण या संमेलनाला उपस्थित राहतील असे गृहीत धरून सारी व्यवस्था करण्यात आली आहे.

महाकवी सुधाकर गायधनी हे संमेलनांचे उद्‌घाटन असून मराठीसाठी लढणारे गो. रा. ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. प्रकाश भगत हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष, पूर्णिमा देसाई या कार्याध्यक्षा तर प्रदीप घाडी आमोणकर हे प्रमुख कार्यवाह आहेत.

Marathi Literary conference
Goa Politics: होय! आम्ही घटना दुरूस्ती करणार; युरी आलेमाव यांचा विनोद तावडेंवर पलटवार

संमेलनास सकाळी ८.३० वाजता श्री. सातेरी महामाया दिंडी पथकाच्या ग्रंथदिंडी मिरवणुकीतून सुरवात होईल. ९.३० वाजता उद्‍घाटन कार्यक्रम होईल.

उद्घाटनसत्रानंतर ''मराठी राजभाषा व गोव्याचे भवितव्य'' तसेच ''अभिव्यक्तीचा आविष्कार आणि आम्ही युवक '' या विषयावर अनुक्रमे डॉ. विठ्ठल ठाकूर व विजय नाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. मराठी असे आमुची मायबोली या काव्य संमेलनात ज्येष्ठ कवी देविदास फुलारी अध्यक्षपद भूषवतील.

गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर ठराव वाचन करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Konkani Marathi Language Dispute
Gondhal Marathi Movie Oscar 2027 Official Entry
Subhash Velingkar Marathi Language Goa
Esakal No. 1 Marathi Website
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com