Alka Kubal: ''गोव्याच्या मातीतून अनेक मोठमोठे कलाकार जन्माला आले, परमेश्वराने...''; अलका कुबल यांनी काढले गौरोद्गार!

Goa KalaRang 2024 Festival: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी गोव्याबद्दल गौरोद्गार काढले आहेत. गोव्याच्या मातीतून अनेक मोठमोठे कलाकार जन्माला आल्याचे अलका कुबल म्हणाल्या.
Alka Kubal: ''गोव्याच्या मातीतून अनेक मोठमोठे कलाकार जन्माला आले, परमेश्वराने...''; अलका कुबल यांनी काढले गौरोद्गार!
Alka KubalDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा हे कलाकारांची भूमी आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गोव्यातील कलाकारांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. खासकरुन, मराठी सिनेसृष्टीचा विचार करायचा झाल्यास आपल्या ध्यानी वर्षा उसगावंकर यांचे नाव लगेच येते. वर्षा उसगावंकर यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एक वेगळीच छाप सोडली.

यातच आता, मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी गोव्याबद्दल गौरोद्गार काढले आहेत. गोव्याच्या मातीतून अनेक मोठमोठे कलाकार जन्माला आल्याचे अलका कुबल म्हणाल्या. एवढ्यावरच न थांबता हा गोव्याच्या मातीला परमेश्वराने दिलेला आशीर्वाद असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कला आणि संस्कृती संचालनालय रवींद्र भवन, मडगाव आणि कलांगण मडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रवींद्र भवनात आयोजित कलारंग 2024 कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

अलका पुढे म्हणाल्या, ''कार्यक्रमानिमित्त मला गोव्याला यायला आवडते. मी आणि वर्षाने अनेक चित्रपटात काम केले आहे. गोवा सरकारने अशाप्रकारचे चांगले कार्यक्रम घडवून आणावेत.''

Alka Kubal: ''गोव्याच्या मातीतून अनेक मोठमोठे कलाकार जन्माला आले, परमेश्वराने...''; अलका कुबल यांनी काढले गौरोद्गार!
Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात हाय व्होल्टेज ड्रामा, वर्षा उसगांवकर - पॅडी कांबळे यांच्यात वाद Video

यावेळी कार्यक्रमासाठी, सावंत सरकारमधील कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat), ख्यातनाम गायिका हेमा सरदेसाई, गोव्याची लेक आणि मराठी अभिनेत्री वर्षा उसगावंकर इत्यादी उपस्थित होते.

Alka Kubal: ''गोव्याच्या मातीतून अनेक मोठमोठे कलाकार जन्माला आले, परमेश्वराने...''; अलका कुबल यांनी काढले गौरोद्गार!
Varsha Usgaonkar: गोवा कॅबिनेट मंत्र्याची लेक ते मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री, वर्षा उसगांवकर यांचा जीवनप्रवास

गोव्याच्या लेकीचे गौरोद्गार

गोव्यात रवींद्र भवनासारख्या वास्तू आणखी उभारण्यात याव्यात. ही गोव्यासाठी सकारात्मक बाब आहे. आता प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे की, त्यांनी गोव्याचे नाव मोठे केले पाहिजे, असे गोव्याची (Goa) लेक आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावंकर म्हणाल्या. एवढचं नाहीतर वर्षा उसगावंकर यांनी यावेळी कोकणीतून गीतही गायले. गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची उपस्थिती कमी होती. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणादरम्यान पावसाचा उल्लेख केला. पण वर्षा उसगावंकर यांनी आपल्या नावाचा उल्लेख करत उपस्थितीच्या चेहऱ्यावर हसू आणले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com