"पांडुरंग हरी"! गोव्यात पहिल्यांदाच होणार विठ्ठल रखुमाई शाही विवाह सोहळा; म्हापशातील देवस्थानात रंगणार शतकोत्सव कार्यक्रम

Vithhal Rakhumai Devsthan: २३ रोजी संध्याकाळी ४.३० ते ७ वाजता गोमंतभूमीत प्रथमच श्री विठ्ठल रखुमाई शाही विवाह सोहळा होईल.
Vithhal Rakhumai Devsthan
Vithhal Rakhumai DevsthanDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: शहराच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठलवाडी, अन्साभाट येथील विठ्ठल रखुमाई देवस्‍थानचा शतकोत्सव महासोहळा गुरूवार २२ जानेवारी ते १ फेब्रूवारीपर्यंत ११ दिवस साजरा करण्यात येणार आहे. यात प्रथमच गोव्यात साजरा होणार विठ्ठल रखुमाई शाही विवाह सोहळा, सहस्र कलश महाअभिषेक व स्वाहाकार सोहळ्याचा समावेश आहे, अशी माहिती देवस्थान समिती अध्यक्ष तुषार टोपले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी परेश नाटेकर कार्याध्यक्ष उर्वेश नाटेकर, माजी अध्यक्ष दीपक डांगी, खजिनदार प्रसाद कवळेकर, मुखत्यार सूरज डांगी, उपाध्यक्ष श्रेयश कवळेकर, उपसचिव रितेश मणेरकर उपस्थित होते. टोपले यांनी सांगितले की, माघ गणेश जयंती ते माघ पौर्णिमापर्यंत माघी ११ दिवसीय गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दररोज दुपारी १ वाजता व रात्री ८.३० वाजता महाआरती तसेच रात्री ८ वाजता अथर्वशीर्ष, स्तोत्रपठन होईल. संध्याकाळी ६.३० वाजता डॉ. राजू पेडणेकर व साथी कलाकारांचे भजन होईल.

२३ रोजी संध्याकाळी ४.३० ते ७ वाजता गोमंतभूमीत प्रथमच श्री विठ्ठल रखुमाई शाही विवाह सोहळा होईल. रात्री ८.३० वाजता स्वरांजली हा भावगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम, यात गायक तेजस वेर्णेकर व गौतमी हेदे बांबोळकर यांचे गायन होईल. सनम कोचकर (हॅन्डसोनिक व ढोलक) मनोहर तामणकर (कीबोर्ड), विशाल कामर्पेकर(तबला), हर्षद खराडे (ऑक्टोपॅड) यांची साथ असेल. शुभदा पाटील यांचे निवेदन करतील.

२४ रोजी सकाळी धार्मिक विधी, संध्याकाळी ६ वाजता पांडुरंग ब्रह्मेश्‍वर मंडळ आखाडा प्रस्तुत महिलांचे भजन, रविवा र ता. २५ रोजी सकाळी धार्मिक विधी, संध्याकाळी ५ वाजता पाककला स्पर्धा (मर्यादित प्रवेश), रात्री ८.३० वाजता कला अकादमी गोवा आयोजित भजनी स्‍पर्धेतील बक्षिसे प्राप्त श्री राम सेवा संघ मयडे बार्देश प्रस्तुत बालविष्कार व महिलांतर्फे हळदीकुंकू होईल. २६ रोजी स. १० वा. सत्यविनायक महापूजा, दुपारी आरती, रात्री ८.३० वाजता गोवा मराठी अकादमी पणजी प्रस्तुत मर्मबंधातली ठेव हा सवेश नाट्यसंगीताचा कार्यक्रम होईल.

२७ रोजी सकाळी धार्मिक विधी, रात्री ९.३० वाजता भूमिका दशावतार नाट्य मंडळाचे नाटक सादर होईल. २८ रोजी धार्मिक विधी, संध्याकाळी ७ वाजता आरतीचा कार्यक्रम होईल. २९ रोजी पालखी नगर प्रदक्षिणा व रात्री ८.३० वाजता हरिपाठ होईल. ३० व ३१ रोजी श्री विष्णुयाग अनुष्ठान, ३० रोजी पुण्याहवाचन, पवमान पंचसुक्त अभिषेक, महापूजा, तद्‍नंतर श्रींची उत्सवमूर्तीची सभामंडपात आगमन होईल.

Vithhal Rakhumai Devsthan
Margao Dindi Mahotsav: विठ्ठल विठ्ठल!मडगावात 116 व्या दिंडी उत्सवास प्रारंभ; मंत्री कामत यांच्या हस्ते समई प्रज्वलन

रात्री ९.३० वाजता वाळवेश्‍वर दशावतार नाट्यमंडल तेंडोलीतर्फे नाटक सादर होईल. ३१ रोजी पवमान, कुंकुमार्चन, महाआरती, दुपारी महाप्रसाद. रात्री ९.३० वाजता विनोदी नाटक ओन्ली फॉर यू सादर होईल.१ फेब्रुवारीला सहस्र कलश महाअभिषेक होईल. धार्मिक विधी पहाटे सुरू होईल. दुपारी महाअभिषेकाची पूर्णाहुती, महाआरती, महाप्रसाद, संध्याकाळी ७ वाजता स्वर अक्षय हा भावगीतांचा कार्यक्रम होईल. तद्‍नंतर उत्तरपूजा, महाआरती व विसर्जन मिरवणूक होईल.

Vithhal Rakhumai Devsthan
Adpoi Ganesh Visarjan: ‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल'! आडपई गावची आगळीवेगळी गणपती विसर्जन परंपरा; Watch Video

देवस्थानाला १०० वर्षे पूर्ण

पोर्तुगीजकाळात १९९८ साली देवस्थानाची स्थापना करण्यात आली होती, पण १९२६ साली त्याची सरकार दरबारी नोंद झाल्यामुळे यावर्षी आम्ही शतकोत्सव महासोहळा साजरा करीत आहोत सर्व गोमंतकीय भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष तुषार टोपले यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com