Mapusa News : ‘मॉडिफिकेशन’मुळेच वाहनांना आग; पोलिस सूत्रांची माहिती

Mapusa News : प्रशिक्षित मॅकेनिककडूनच काम करावे
Mapusa
Mapusa Dainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा, अलीकडे वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटनांमध्ये राज्यात वाढ झाली आहे. चारचाकींचा यात प्रामुख्याने समावेश आहे.

वाहनांमधील ओव्हर अ‍ॅक्सेसरीज किंवा सैल वायर फिटिंगसह वाहनांमध्ये केलेले फेरबदल हे आगीच्या घटानांना कारण ठरताहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली.

प्रत्येक कंपनीची गाडी ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली असते. त्यामुळे प्रशिक्षित मॅकेनिककडूनच काम करून घेतल्यास आग लागण्याच्या घटना कमी होऊ शकतात. चुकीच्या वायरिंगमुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पैसे वाचवण्याच्या नादात किंवा अतिरिक्त मॉडिफिकेशनच्या नावाने आर्थिक नुकसान करून घेणे टाळावे.

वाहन खरेदी केल्यानंतर अनेकजण अनधिकृत किंवा स्थानिक पातळीवर त्यांच्या वाहनांत एलईडी बल्ब, स्पीकर, अ‍ॅम्प्लीफायर, ब्लूटूथ, मागील कॅमेरा (रिव्हर्स) आदी उपकरणे बसवतात. अशावेळी खासगी डिलर्सकडून केलेल्या बाह्यफिटिंगमुळे गाड्यांना आग लागू शकते. यादरम्यान, फिटिंगवेळी वायर सैल राहू शकते. अयोग्य फिटिंग व तारांवरील ताणामुळे शॉर्टसर्किट होऊन वाहनांना आग लागू शकते. त्याचप्रमाणे जुन्या वाहनांमध्ये वायरिंग व बॅटरीतील बिघाडांमुळे आग लागल्याचे दिसून येते.

तसेच, आगीच्या घटनांना इतरही घटक कारणीभूत असतात. यामध्ये गाडीचा मेन्टेनन्स, वाहन चालवण्याची पद्धत, खूप काळ गाडीचे सर्व्हिसिंग न करणे, तसेच स्वस्तात काम करण्यासाठी लोकल गॅरेजमधून काम करून घेतले जाते. त्यामुळे थोडे जास्त पैसे खर्च झाल्यास हरकत नाही. मात्र, अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरमधून केलेले सर्व्हिसिंग हमी देणारे ठरते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

अतिरिक्त बदल वाढवतात ताण

अनेकदा कारमालक क्षमतेपेक्षा ज्यादा म्युझिक प्लेअर बसवितात. तर अनेकजण वाहनात अतिरिक्त दिवे बसवतात. तसेच मोबाईल चार्जिंगचे जास्त पाँइंट, त्यामुळे वाहनांच्या बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो.

शॉर्ट सर्किटला हे निमित्त होते व कार किंवा दुचाकी पेट घेते. या संभावना नाकारता येत नाहीत. आगीपासून वाचण्यासाठी वाहनांची वेळोवेळी देखभाल व सर्व्हिंसिंग गरजेचे आहे तसेच कारचे वायरिंग नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.

Mapusa
South Goa : ध्रुवीकरणाचा मुद्दा भाजपवर बुमरँग; दक्षिणेतील पराभव ख्रिस्ती धर्मगुरूंमुळे हे ढवळीकर, माविन यांना अमान्य

बदल अधिकृत सेंटरमध्ये करावेत

१ गाडीत जास्तीच्या अ‍ॅक्सेसरीज लावू नयेत. यामुळे गाडीच्या बॅटरीवर लोड येऊन आग लागू शकते व वायरिंग खराब होऊ शकतात. साउंड सिस्टीममध्ये बदल किंवा इतर गोष्टी करायच्या असल्यास अधिकृत सेंटरमध्ये कराव्यात.

२ गाडीची इंधन टाकी पूर्णपणे भरू नये. इंधनाची पातळी अर्ध्या ते दोन तृतीयांश दरम्यान ठेवावी. जेणेकरून टाकी गॅस चेंबरमध्ये बदलणार नाही. आपत्कालीन स्थिती टाळण्याकरिता गाडीत अग्निशामक यंत्र (कोरडे प्रकार) ठेवावेत.

३ कारमध्ये आग लागल्यास व गाडीचा विमा उतरवला असल्यास विम्याचा दावा करू शकतो. आगीच्या घटनेनंतर, कंपनीकडे किंवा एजंटकडून पॉलिसी घेतली आहे त्यांना माहिती द्यावी. एफआयआर नोंदवल्यानंतर आवश्‍यक कागदपत्रे विमा पॉलिसी कंपनीकडे सुपुर्द करावीत.

ओव्हर अ‍ॅक्सेसरीज किंवा सैल वायर फिटिंगसचा धोका

बॅटरीवरील ताणामुळे होते शाॅर्टसर्किट

अनधिकृत डिलर्स, मेकॅनिककडून कामे करून घेणे टाळावे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com