Mapusa News : पाल्‍यांवर तणाव वाढू नये याची काळजी घ्‍या : डॉ. रुपेश पाटकर

Mapusa News : ज्ञानप्रसारक विद्यालयात पालक-शिक्षक संघ मेळावा
Mapusa
Mapusa Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News :

म्हापसा, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकत्व, निरोगी जीवन, प्रेम, योग्य मार्गदर्शन आवश्‍‍यक आहे.

पालकांनी आपल्‍या पाल्‍यांशी संवाद साधून त्‍यांना समजून घेतले पाहिजे. कोणत्‍याही कारणांमुळे पाल्यांवर तणाव वाढू नये, ते नैराश्‍‍येत जाऊ नये, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी केले.

म्‍हापसा येथील वैश्य मंडळाच्या सभागृहात ज्ञानप्रसारक विद्यालयाच्या माध्यमिक विभागासाठी आयोजित पालक-शिक्षक संघाच्‍या बैठकीत प्रमुख वक्ते म्‍हणून डॉ. पाटकर बोलत होते.

Mapusa
C K Naidu Trophy: गोव्याच्या युवा संघाची उडाली दाणादाण; नायडू करंडक स्पर्धेत रेल्वेचा शानदार विजय

मुख्याध्यापक गुरुदास पालकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांची बलस्थाने आणि त्यांच्या सुधारणेचे क्षेत्र याविषयी पालकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांनी पालकांना नव्याने लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल अधिक माहिती दिली.

शाळेच्या व्यवस्थापिका शांती शिरसाट यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेवर विश्वास ठेवल्याबद्दल पालकांचे कौतुक केले. शाळेच्या समुपदेशिका मिल्ड्रेड मेंडिस यांनी पालकांना सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेचे रक्षण करण्यास विनंती केली. एसबीआयचे मुख्य व्यवस्थापक समीर बोरवंडकर यांनी पालकांना लहान वयातच मुलांना पैसे साठवण्याविषयी प्रोत्साहित केले, जेणेकरून त्यांना मोठे झाल्यावर आर्थिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी होण्यास मदत होईल.

वाहतूक पोलिस कालिदास पास्ते यांनी मुलांना जबाबदार नागरिक बनण्याचे तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा गौरव

२०२३-२०२४ या शालेय वर्षात दहावीच्या परीक्षेत यशवंत झालेल्‍या विद्यार्थ्यांचा व त्याचबरोबर डिरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स गोवातर्फे घेण्यात आलेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत, राज्यस्तरीय विजेतेपद मिळवलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना पालक-शिक्षक संघातर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

दोन नवीन पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांच्या निवडीसह बैठक संपली. सूत्रसंचालन प्रेरणा शेट्ये यांनी केले तर पालक-शिक्षक संघ सहसचिव इंदिरा फळगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com