Mapusa: बापरे! 9 वीच्या विद्यार्थ्याला वर्गमित्राकडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण; संशयित मुलाची शाळेत दहशत

Mapusa school fight news: शाळेतील क्षुल्लक वादातून एका मुलाकडून १४ वर्षीय इयत्ता नववीच्या वर्गमित्रास मारबडव केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Mapusa school fight news
Mapusa school fight newsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: शाळेतील क्षुल्लक वादातून एका मुलाकडून १४ वर्षीय इयत्ता नववीच्या वर्गमित्रास मारबडव केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या कथित मारहाणीत जखमी पीडित विद्यार्थ्यावर सध्या म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने संशयित मुलाला तीन दिवसांसाठी निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे.

ही संतापजनक घटना म्हापसा शहरातील एका नामांकित विद्यालयात गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी म्हापसा पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे.

या फिर्यादीनुसार, म्हापसा पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे याप्रकरणी अहवाल पाठवला आहे. पीडित मुलाला संशयित मुलाने विद्यालयाच्या स्वच्छतागृहात बोलावून नेले आणि तिथे त्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

Mapusa school fight news
Crime News: राजकारणात खळबळ! 'आप' नेत्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या, भररस्त्यात 10 राऊंड फायरिंग Watch Video

स्वच्छतागृहातून मुलाचा ओरडण्याचा आवाज येत असल्याने तिथे त्याच वर्गातील मुलगा गेला. त्याने पीडित मुलाची संशयित वर्गमित्राच्या तावडीतून सुटका केली आणि शिक्षकांना माहिती दिल्यावर जखमीला जिल्हा इस्पितळात दाखल केले. त्यानंतर सायंकाळी पीडित मुलाच्या पालकांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दिली.

Mapusa school fight news
Goa Crime: गोवा पोलिसांची 'मेगा' कारवाई; 2025 मध्ये 212 पेडलर्सना दाखवला तुरुंगाचा रस्ता

संशयित मुलाची शाळेत दहशत

संशयित मुलाची शाळेमध्ये दहशत असून क्षुल्लक कारणावरून तो मिळेल, त्याला मारझोड करतो. यापूर्वीही त्याने आपल्या मुलाला अनेकदा मारहाण केली आहे. तीन दिवसांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर हा मुलगा परत आपल्या मुलासह इतरांना मारहाण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा वृत्तीच्या या मुलाला शाळेतून बडतर्फ करावे, अशी मागणी पीडित मुलाच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे केल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com