Mapusa: म्हापशात भर पावसात डांबरीकरणाचे काम सुरू...करदात्यांच्या पैशांचा चुराडा, स्थानिकांकडून संताप

Mapusa Road Tarring In Rain: म्हापसा शहरात भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
Mapusa
MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: येथील शहरात भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, ढगाळ वातावरण आणि अधूनमधून मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी येत असताना, खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. अशाही स्थितीत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. यावरून, स्थानिकांनी संताप व्यक्त करीत वरील प्रकार म्हणजे करदात्यांच्या पैशांचा चुराडा असल्याचे लोकांनी म्हटले.

मंगळवारी (ता.२०), म्हापसा शहरात विविध ठिकाणी डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. नियोजित कामानुसार कार्व्हालो पेट्रोल ते श्री बोडगेश्वर मंदिराजवळील रस्त्यावर हे काम हाती घेण्यात आले. यावेळी पावसाच्या सरी कोसळत असताना, हॉटमिक्सिंग करण्यात आले. हा अजब प्रकार पाहून, स्थानिकांनी चीड व संताप व्यक्त केला.

Mapusa
Corona In Goa: कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, वास्‍कोत सापडला नवीन कोविड रुग्‍ण, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 257 वर

आमदार जोशुआ म्हणाले, हे काम नियोजिते आणि नियोजनबद्ध होते. मुळात काम शेवटच्या टप्प्यात घेतले जात नाही. एकदा विकासकाम पूर्ण केल्यानंतर, हॉटमिक्सिंग हाती घेतले जाते. नियोजनानुसार, डांबराने भरलेले पाच ट्रक हे हॉटमिक्सिंगसाठी आले होते. त्यानुसार कंत्राटदाराला ते घालावे लागले, अन्यथा ते वायाच गेले असते. ते पुढे म्हणाले, हवामानाचा इशारा असूनही आम्ही कुचेली रस्ता पूर्ण करण्यात यशस्वी झालो. एकदा उघडीप मिळाली, की आम्ही काम सुरू करु.

Mapusa
Goa Safety Campaign: महिलांनो, निर्धास्त प्रवास करा; पणजीचा महापौर आणि परिवहन मंत्र्यांच्या हस्ते 'हेल्पलाइन स्टिकर' मोहीम

अजब प्रकार

भिके म्हणाले, भर पावसात हॉटमिक्सिंग घालण्याचा अजब प्रकार घडला. यातून, करदात्यांच्या पैशांचा चुराडा झाला. हे पैसे लोकप्रतिनिधींच्या खिशातील नाही. आठवड्याभरात शहरातील प्रलंबित कामे पूर्ण झाली नाही तर प्रत्येक शासकीय विभागांवर आम्ही मोर्चा काढणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com