Mapusa Road : म्हापशातील रस्त्यांची चाळण; सार्वजनिक बांधकाम खाते, पालिका निद्रिस्त

Mapusa Road : येथील एक वाहनचालक सचिन किटलेकर म्हणाले की, म्हापसा मतदारसंघातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
Mapusa Road
Mapusa RoadDainik Gomantak

Mapusa Road :

बार्देश, पावसाळा सुरू होऊन अवघेच दिवस झाले असून म्हापसा मतदारसंघातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडून त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहात असल्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अशा खड्डेमय मार्गावरून कसरत करत वाहन चालवणे वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. अनेकांची वाहने यामुळे खराब झाली असून प्रवासी, वाहनचालकांनाही छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

येथील एक वाहनचालक सचिन किटलेकर म्हणाले की, म्हापसा मतदारसंघातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून राहिल्याने वाहनचालकांना खासकरून दुचाकी वाहनचालकांना बराच त्रास होतो.

रात्रीच्या वेळी अंधारातून जाताना त्या खड्ड्यांमध्ये साचून राहिलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही. अशा खड्ड्यांमध्ये वाहन गेल्यामुळे चालकांना शारीरिक इजाही होते. त्यामुळे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम खाते अथवा म्हापसा पालिकेने त्वरित दुरुस्त करावेत.

महेश शिरगावकर यांनी सांगितले की, म्हापसा मतदारसंघातील अनेक रस्त्यांवर असंख्य खड्डे असून त्यात पावसाचे पाणी साचून राहते. एखादे वाहन तेथून गेल्यास खड्ड्यांत साचून राहिलेले पाणी बाजूने जाणाऱ्या वाहनांवर तसेच पादचाऱ्यांवर उसळून त्यांचे कपडे खराब होतात. त्यामुळे ते ज्या कामासाठी बाहेर पडलेले असतात, त्यावर विरजण पडते. अनेकदा या कारणावरून नागरिकांमध्ये वादही होत आहेत.

Mapusa Road
Mumbai Goa Highway: परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली, मुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक

आमदारांचे आश्‍वासन हवेतच

म्हापसा मतदारसंघाचे आमदार तथा गोवा विधानसभेचे उपसभापती ज्योशुआ डिसोझा यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सांगितले होते की, म्हापसा मतदारसंघातील रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येईल. काही मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यातही आले. पण इतर रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे आमदारांनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्‍न मतदारसंघातील लोक विचारत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com