Mapusa: पोलीस स्थानक आहे की स्क्रॅपयार्ड? म्हापसा येथे 200 वाहने पडून, अस्वच्छतेमुळे डासांची पैदास; रोगराई पसरण्याची भीती

Mapusa Police Station: म्हापसा पोलिस स्‍थानकात धूळ खात पडून असलेल्या वाहनांची मोठी समस्या बनली आहे. सध्या हे पोलिस स्थानक वाहनांचे मोठे स्क्रॅप यार्डच बनले आहे.
Mapusa police station abandoned vehicles
Mapusa police station abandoned vehiclesDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: येथील शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांप्रमाणेच, म्हापसा पोलिस स्‍थानकात धूळ खात पडून असलेल्या वाहनांची मोठी समस्या बनली आहे. सध्या हे पोलिस स्थानक वाहनांचे मोठे स्क्रॅप यार्डच बनले आहे.

जागोजागी अपघातग्रस्त वाहने टाकली आहेत. परिणामी, पावसाळ्यात डासांची पैदास होऊन रोगराई पसरू शकते, अशी भीती आजच्या बैठकीत ‘गोवा कॅन’चे संयोजक रोलँड मार्टिन्स यांनी व्यक्त केली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली.

पावसाळ्यात रोगराईवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी उपाययोजना म्हणून बार्देशच्या उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी म्हापसा पालिका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, ‘गोवा कॅन’ या संस्थेसोबत आज मंगळवारी (ता.१८) बैठक घेतली.

Mapusa police station abandoned vehicles
Mapusa Urban Bank: म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचे 70 कोटी परत मिळणार? माजी केंद्रीय मंत्र्यांनी सुचवला प्लान

म्हापसा पोलिस स्थानक, केटीसी बसस्थानक तसेच इतर सार्वजनिक कार्यालयांचा परिसर हा आरोग्याच्या दृष्‍टीने स्वच्छ असावा, जेणेकरून पावसाळ्यात तेथे डासांची पैदास होऊ नये व डासांच्या प्रजनन स्रोतावर नियंत्रण असावे, असे मार्टिन्स यांनी सांगितले.

Mapusa police station abandoned vehicles
Mapusa: जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया! म्हापशातील खोदकामांमुळे धुळीचे साम्राज्य; स्थानिकांना मनस्ताप

दोनशेपेक्षा अधिक वाहने पडून

म्हापसा पोलिस स्थानकाच्या आवारात चारचाकी व दुचाकी मिळून जवळपास दोनशेपेक्षा अधिक वाहने धूळ खात पडून आहेत. त्‍यात अपघातग्रस्त वाहने, वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली वाहने, चोरीची वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. अशा बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारकडे सध्‍या धोरण किंवा डंपिंगसाठी हक्काची जागा नसल्याने अनेक पोलिस स्थानकांना ओंगळवाणे स्‍वरूप आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com